आर.अश्विनच्या परदेश दौऱयावरील निराशाजनक कामगिरीनंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या भारतीय संघात परतण्याची आशा उमटू लागली असताना अनुभवी हरभजनने अश्विनकडे कोणत्याही व्ययक्तीक स्पर्धेने मी बघत नाही किंवा तुलनाही मी करत नसल्याचे म्हटले आहे.
हरभजन म्हणतो की, भारतीय संघासाठी खेळलेली ती वर्षे माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. मी कोणाशीही व्ययक्तीक तुलाना केलेली नाही. क्रिकेटमध्ये आपली स्वत:शीच स्पर्धा असते प्रत्येक जण आपली खेळी चांगली कशी होईल याकडे लक्ष देत असतो. दोन किंवा तीन सामन्यांतील पराभवामुळे संघाची पात्रता ठरवता येत नाही. त्यामुळे सध्याच्या भारतीय संघाबद्दल काही बोलणे मला योग्य वाटत नाही. असेही हरभजन म्हणाला.
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळून झाल्यानंतर पुन्हा स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळत राहणे कठीण असते. माझ्या खेळीची प्रत कशी सुधारता येईल यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू असतात आणि राहतील असेही हरभजन पुढे म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा