इटलीच्या मॅटिओ ट्रेन्टिन याने शेवटच्या दोन किलोमीटरमध्ये जोरदार सायकलिंग करत टूर-डी-फ्रान्स सायकल शर्यतीमधील १४व्या टप्प्यात अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडच्या ख्रिस फ्रूमी याने सर्व खेळाडूंमध्ये आघाडीस्थान कायम राखले आहे.
सेंट पुर्केन ते लिऑन अशी १९१ किलोमीटर अंतराची शर्यत ट्रेन्टिनने चार तास १५ मिनिटे ११ सेकंदात पार केली. शेवटचे दोन किलोमीटर अंतर शिल्लक असताना जर्मनीचा ग्रेश्चेक सिमोन आघाडीवर होता. मात्र शेवटची चढण पार करताना त्याची दमछाक झाली. त्याला सहा खेळाडूंनी मागे टाकले. स्विस खेळाडू मायकेल अल्बासिनीने दुसऱ्या क्रमांकाने शर्यत पार केली. त्याच्या पाठोपाठ अँड्रय़ू तालनस्की (अमेरिका), होजे जोक्विन रोजस, गार्सिया ईगोईट्स (दोन्ही स्पेन) यांनी शर्यत पूर्ण केली. सिमोन याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
एकूणात फ्रूमीने आघाडी कायम ठेवली आहे. त्याच्या पाठोपाठ बॉके मोलेमा (नेदरलँड्स), अल्बटरे कोन्टाडोर (स्पेन), रोमन क्रेझीगर (झेक प्रजासत्ताक), लॉरेन्स डॅम (नेदरलँड्स) हे अनुक्रमे दुसऱ्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा