Travis Head breaks Rishabh Pant’s record: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या नाबाद २५१ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने ऋषभ पंतचा एक विक्रम मोडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७६ धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर स्मिथ आणि हेडच्या जोडीने शानदार फलंदाजी केली. या दोघांनी दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत एकही विकेट गमावली नाही. त्याचबरोबर पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाला ३ बाद ३२७ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. स्मिथ ९५ आणि हेड १४६ धावांवर नाबाद होते. या दोघांच्या भागीदारीने अनेक विक्रम केले असतानाच हेडने ऋषभ पंतचा एक विक्रमही उद्ध्वस्त केला.

खरेतर, चालू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ चक्रातील या सामन्यापूर्वी, ऋषभ पंत हा सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला खेळाडू होता. पण ट्रॅव्हिस हेडने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शानदार शतक झळकावून ऋषभ पंतचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. हेडने या डावात १०६ चेंडूत शतक झळकावले. आता त्याचा स्ट्राइक रेट डब्ल्यूटीसीच्या संपूर्ण हंगामात (२०२१-२३) सर्वोच्च झाला आहे. कसोटी सामन्यात एकदिवसीय शैलीत फलंदाजी करताना त्याने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

हेही वाचा – IND vs AUS WTC 2023 Final: रोहित शर्मा आणि पॅट कमिन्सने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला ‘हा पराक्रम

डब्ल्यूटीसी २०२१-२३ मध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेले फलंदाज –

८१.९१ – ट्रॅव्हिस हेड (फायनलच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत…)
८०.८१ – ऋषभ पंत (भारत)
६८.९० – जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
६६.०४ – ऑली पोप (इंग्लंड)

ट्रॅव्हिस हेडची कामगिरी कशी होती?

ट्रॅव्हिस हेडच्या डब्ल्यूटीसी स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने या स्पर्धेत शानदार फलंदाजी केली आहे. यामध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेननंतर तो टॉप ५ मधला तिसरा कांगारू खेळाडू आहे. स्टीव्ह स्मिथ सहाव्या क्रमांकावर आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस हेडने या मोसमात १८ सामन्यांच्या २७ डावांत १३५४ धावा केल्या आहेत. त्याचे हे चौथे शतक ठरले. त्याचवेळी त्याने या हंगामात ६ अर्धशतकेही झळकावली. त्याची सरासरी ५८.८६ आणि सर्वोत्तम धावसंख्या १७५ धावा होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travis head breaks rishabh pants record for highest strike rate in wtc tournament vbm