Travis Head Broke Rohit Sharma Record: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने अशी विस्फोटक फलंदाजी केली की विक्रमांची मालिका रचली. ट्रॅव्हिस हेडच्या स्फोटक शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१६ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग तर केलाच पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग १३वा विजय नोंदवून विक्रमही केला. ट्रेव्हिस हेडच्या विस्फोटक फलंदाजीने त्याने वनडे क्रिकेटमधील रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.

ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना बेन डकेटच्या ९५ धावा आणि विल जॅकच्या ६२ धावांच्या जोरावर यजमान इंग्लंडने ४९.४ षटकांत ३१५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. ॲडम झाम्पा आणि मार्नस लॅबुशेनने प्रत्येकी ३ विकेट घेतले. गोलंदाजांनंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या बॅझबॉलचा चांगलाच धुव्वा उडवला. प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनात इंग्लंड संघाने अंगीकारलेली आक्रमक खेळाच्या मानसिकतेला बॅझबॉल असं म्हटलं जातं. मॅक्युलम इंग्लंडच्या फक्त कसोटीमध्ये प्रशिक्षकपदी होता आता इंग्लंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे.

AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Sai Sudarshan century against Australia A
Sai Sudarshan : आयपीएलमध्ये रिटेन करताच साई सुदर्शनचा शतकी नजराणा, ऑस्ट्रेलियात साकारली दमदार खेळी

हेही वाचा – Ravichandran Ashwin: “एक क्षण असा आला की मला…”, अश्विनने सांगितला मैदानातील संघर्ष; शतकाचं श्रेय जडेजाला देत म्हणाला…

इंग्लंडच्या ३१५ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात काही खास झाली नाही आणि पहिला धक्का चौथ्या षटकात मिचेल मार्शच्या रूपाने बसला. मात्र, यानंतर ट्रॅव्हिस हेडने एका टोकाला पाय घट्ट रोवून उभे राहत मार्नस लॅबुशेनच्या साथीने इंग्लिश गोलंदाजांवर असा काही हल्लाबोल केला की ३१६ धावांचे लक्ष्य अवघ्या ४४ षटकांत पार केले.

हेही वाचा – R Ashwin-Jadeja Partnership: अश्विन-जडेजाने वाचवला सन्मान, विक्रमी भागीदारीसह तोडले अनेक रेकॉर्ड, ठरली नंबर वन जोडी

ट्रॅव्हिस हेडने केवळ १२९ चेंडूंमध्ये २० चौकार आणि ५ षटकारांसह १५४ धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीमुळे त्याने नवा इतिहास रचला. या खेळीच्या मदतीने हेडने इतिहास घडवला आहे. ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये दुसऱ्यांदा १५० हून अधिक धावा केल्या. अशाप्रकारे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध १५०हून अधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. हेडची वनडेमधली ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध १५२ धावांची इनिंग खेळली होती.

हेही वाचा – IND vs BAN: बांगलादेश कसोटीत रोहित शर्माचा मास्ट्ररस्ट्रोक, तीन विकेट्स गमावल्यानंतरही भारताने कसा सावरला डाव?

ENG vs AUS: हेडने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला

नॉटिंगहॅम येथे एकदिवसीय सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना हेड
सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने जुलै २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध १३७ धावांची नाबाद खेळी खेळली आणि भारताला ८ विकेटने विजय मिळवून दिला होता.

ENG vs AUS ODI सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या

१६१* – शेन वॉटसन, मेलबर्न, २०११
१५४* – ट्रॅव्हिस हेड, नॉटिंगहॅम, २०२४*
१५२ – ट्रॅव्हिस हेड, मेलबर्न, २०२२
१४५ – डीन जोन्स, ब्रिस्बेन, १९९०
१४३ – शेन वॉटसन, साउथम्प्टन, २०१३

ट्रॅव्हिस हेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३ शतके झळकावली आहेत. जेव्हा जेव्हा हेडने शतक झळकावले, तेव्हा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे हेडच्या खेळीवर सर्वांचं विशेष लक्ष आहे.