Travis Head Century In Day-Night Test Match: विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेडच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला सामन्यात कायम ठेवलं आहे. ॲडलेडच्या मैदानावरील डे नाईट कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात १८० धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने टी ब्रेकपर्यंत ८ विकेट गमावून ३३२ धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियासाठी दमदार शतक झळकावले असून कसोटीत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ट्रेव्हिस हेडचं जलद शतक
ट्रॅव्हिस हेडने डावाच्या सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली. हेड भारतीय गोलंदाजांसाठी मोठे डोकेदुखी ठरला होता. त्याने अवघ्या १११ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि डे-नाईट कसोटी सामन्यात त्याचाच वेगवान शतकाचा विक्रम मोडला. याआधी ट्रॅव्हिस हेडने २०२२ साली इंग्लंडविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ११२ चेंडूत शतक झळकावले होते.
दिवस-रात्र कसोटी सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज
१११ चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध भारत, २०२४
११२ चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध इंग्लंड, २०२२
१२५ चेंडू, ट्रॅव्हिस हेड विरुद्ध वेस्ट इंडिज, २०२२
१३९ चेंडू, जो रूट विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१७
१४० चेंडू, असद शफीक विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१७
भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडने १४१ चेंडूत १४० धावा करत सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यादरम्यान त्याने १७ चौकार आणि चार षटकार मारले आहेत. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे ३१वे शतक आहे. याशिवाय डे-नाईट कसोटी सामन्यातील त्याचे हे तिसरे शतक आहे. फक्त मार्नस लबुशेन त्याच्या पुढे आहे. ज्याने दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये एकूण चार शतकं झळकावली आहेत.
दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाजा
मार्नस लबुशेन – ४ शतके
ट्रॅव्हिस हेड- ३ शतके
असद शफीक- २ शतके
दिमुथ करुणारत्ने- २ शतके