IND vs AUS Travis Head Injured in Gabba Test: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे. आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाकडून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मात्र, हा खेळाडू पुढील कसोटी सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. गाबा कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी त्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गाबा कसोटीच्या पाचव्या दिवशी हेड फलंदाजीसाठी आला तेव्हा तो अडचणीत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. हेड मांडीच्या दुखापतीने त्रस्त आहे. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या हेडला दुसऱ्या डावात केवळ १७ धावा करता आल्या. विकेटच्या दरम्यान धावा करतानाही तो अडचणीत दिसला. भारताच्या दुसऱ्या डावात तो क्षेत्ररक्षणासाठीही आला नाही.

IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान

हेही वाचा – WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण?

गाबा कसोटीच्या यजमान संघाच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकावत १५६ धावांची दमदार खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना त्याने आपल्या दुखापतीवरही अपडेट दिले आहेत. हेड म्हणाला, मी माझ्या फलंदाजीवर खूप आनंदी आहे. थोडी सूज आहे पण पुढच्या सामन्यापर्यंत ठीक होईल. विकेट आव्हानात्मक होती. मला धावांसाठी खूप मेहनत करावी लागली. स्टीव्ह स्मिथबरोबरची भागीदारी चांगली ठरली. मी परिस्थितीशी झटपट जुळवून घेण्यावर लक्ष केंद्रित केलं. स्मिथ देखील फॉर्ममध्ये परतला होता, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला कारण मला आता माहित होतं आता तो मोठी खेळी करणार.

हेही वाचा – R Ashwin Net Worth: ९ कोटींचं घर, मीडिया कंपनी, लग्झरी कार…, १०० कोटींपेक्षा जास्त आहे अश्विनची एकूण संपत्ती

पावसाने व्यत्यय आणलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी बुधवारी अनिर्णित राहिली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. खराब प्रकाश आणि पावसामुळे खेळ थांबला, तेव्हा भारताने विजयासाठी २७५ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना बिनबाद ८ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल प्रत्येकी चार धावा करून क्रीजवर होते.

हेही वाचा – Virat Kohli on R Ashwin Retirement: “१४ वर्षे तुझ्याबरोबर खेळलो आणि आज तू…”, विराटही झाला भावुक, अश्विनच्या निवृत्तीबाबत पोस्ट करत म्हणाला

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव सात गड्यांच्या मोबदल्यात ८९ धावांवर घोषित करण्याचा धाडसी निर्णय घेत भारताला २७५ धावांचे लक्ष्य दिले. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सहा षटकांत १८ धावा देऊन ३ बळी घेतले, तर मोहम्मद सिराजला दोन आणि आकाश दीपनेही दोन विकेट घेतले.

Story img Loader