Travis Head Huge Record with Century at Gabba: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटीत ट्रॅव्हिस हेडने पुन्हा एकदा भारतीय संघाला बॅकफूटवर टाकले आहे. तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने ७५ धावांवर ३ विकेट्स गमावले होते. सामन्यावर भारताची मजबूत पकड होती. पण भारतासाठी कर्दनकाळ ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडने आपल्या फटकेबाजीच्या जोरावर सामना फिरवला. हेडने गाबा कसोटीत ९वे कसोटी शतक झळकावत मोठा विक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रॅव्हिस हेडने डावाच्या सुरुवातीपासूनच शानदार फलंदाजी केली आणि भारतीय गोलंदाजांना त्याच्यावर दबाव बनवण्याची संधी दिली नाही. ट्रॅव्हिस हेडने १३ चौकारांच्या मदतीने १०३ धावा केल्या आणि अजूनही मैदानावर पाय घट्ट रोवून उभा आहे.

ट्रॅव्हिस हेड भारतीय संघाविरुद्ध नेहमीच खूप धावा करतो. त्याच्या शतकासह भारताविरूद्धच्या सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडने सर्वात जलद १ हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याचे टीम इंडियाविरुद्धचे हे एकूण तिसरे शतक आहे. त्याने भारताविरुद्धच्या १३ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण १६३ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकं आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – IND vs AUS: सिराजची युक्ती अन् नितीश रेड्डीने मिळवून दिली विकेट, लबुशेनला बेल्सची परत अदलाबदली करणं पडलं महागात; VIDEO व्हायरल

ट्रॅव्हिस हेडने घडवला इतिहास

ट्रॅव्हिस हेड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात किंग जोडी म्हणजेच डावाच्या पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद होणे आणि त्याच कॅलेंडर वर्षात त्याच मैदानावर शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी कोणालाही कसोटीत अशी कामगिरी करता आली नव्हती.

हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान

ट्रॅव्हिस हेड जानेवारी २०२४ मध्ये ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता, म्हणजेच किंग पेयर ठरला होता. आता डिसेंबर २०२४ मध्ये ट्रॅव्हिस हेडने ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर भारताविरुद्ध शतक झळकावले आहे. तो गाबाच्या मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी करतो आणि त्याने आतापर्यंत दोन शतकांसह एकूण ४५२ धावा केल्या आहेत.

ट्रॅव्हिस हेडने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले. गेल्या काही वर्षांतील त्याच्या चांगल्या कामगिरीने संघाला खूप फायदा झाला आहे. आतापर्यंत त्याने ५२ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३५३३ धावा केल्या आहेत आणि तो ऑस्ट्रेलियन फलंदाजी क्रमातील महत्त्वाचा दुवा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travis head is the first batter in test cricket to bag a king pair century at a venue in the same calendar year ind vs aus gabba bdg