Travis Head Statement on Fight With Mohammed Siraj: ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर १५७ धावांची आघाडी मिळवली. हेडने शतकी खेळी केल्यानंतरही फटकेबाजी करतच होता, त्याची ही खेळी भारतीय संघासाठी चांगलीच डोकेदुखी ठरली होती. १४० धावांवर खेळत असताना अखेरीस सिराजने त्याला क्लीन बोल्ड करत बाद केले. यानंतर या दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. तर सिराजने हातवारे करत त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचे सांगितले. पण नेमकं या दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं, हे हेडने सामन्यानंतर सांगितलं आहे.

ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर ब्रॉडकास्टर्सशी बोलताना या व्हायरल हो असलेल्या भांडणाबद्दल सांगितलं. ट्रॅव्हिस हेडने बोलताना सांगितलं की, मोहम्मद सिराजने बाद केल्यानंतर ज्या पद्धतीने त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन केलं आणि प्रतिक्रिया दिली ते पाहून तो निराश झाला. तर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व इतरही माजी खेळाडूंनी सिराजचं हे सेलिब्रेशन पाहून त्याला ट्रोल केलं.

हेही वाच – VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

सिराज आणि हेडमध्ये विकेटनंतर का रंगला वाद?

ट्रॅव्हिस हेड म्हणाला, “मी त्याला म्हणालो चांगला बॉल टाकलास पण त्याने याचा काहीतरी वेगळाच अर्थ घेतला… जेव्हा त्याने अशी प्रतिक्रिया दिली ते पाहून मी सुद्धा प्रत्युत्तर दिलं.” हेड पुढे म्हणाला, “माझ्या बोलण्याचा अनर्थ घेत त्याने ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली ते पाहून मी थोडा निराश झालो. आता जे आहे ते आहे. जर त्यांना असंच वागायचं असेल आणि स्वत:ला जगासमोर असंच दाखवायचं आहे. तर ठिके तसंच वागा.”

हेही वाचा – Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य

सुनील गावसकरांनी देखील सिराजच्या या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले, “हे करण्याची काहीच गरज नव्हती, जर तुम्ही मला विचाराल तर हेडने १४० धावा केल्या आहेत, चार-पाच धावांवर तुम्ही त्याला बाद केलं नाहीय. त्याने १४० धावा केल्या आणि त्याच्या विकेटचं अशाप्रकारे सेलिब्रेशन करत आहात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रेक्षक त्याच्या विरोधात होते यात नवल नाही. ट्रॅव्हिस हेडचं हे घरच मैदान आहे, तो इथला हिरो आहे आणि त्याने १०० धावा केल्या होत्या, तो बाद झाल्यानंतर जर टाळ्या वाजवल्या असत्या तर सिराज संपूर्ण प्रेक्षकांसाठी हिरो ठरला असता. पण त्याच्या विकेटचं असं सेलिब्रेशन करत सिराज खलनायक झाला.”

Story img Loader