New Zealand vs Bangladesh ODI World Cup 2023 Match Score in Marathi: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ११व्या सामन्यात शुक्रवारी न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत, बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासला गोल्डन डकवर बाद करून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन केला विक्रम –

बांगलादेशविरुद्ध किवी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कर्णधार केन विल्यमसनने ट्रेंट बोल्टकडे चेंडू सोपवला. बोल्टच्या या षटकाचा सामना करण्यासाठी लिटन दास क्रीजवर उपस्थित होता. त्याने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याचा झेल फाइन लेगवर उभ्या असलेल्या हेन्रीकडे सोपवला आणि गोल्डन डकवर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बोल्टने विकेट घेतली आणि किवी संघाने आनंदाने उड्या मारत एक उत्कृष्ट विक्रम आपल्या नावावर केला.

Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Pratham Singh Scores Maiden Duleep Trophy Century for India A vs India D Match
Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या जागी आलेल्या ३२ वर्षीय बदली खेळाडूने झळकावले दुलीप ट्रॉफीतील पहिले शतक, जाणून घ्या कोण आहे?
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Joe root make most test runs at lords cricket ground
Joe root : जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! सर्व फलंदाजांना मागे टाकत लॉर्ड्सवर केली खास कामगिरी
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
PAK vs BAN Shakib Al Hasan Throw Ball on Mohammed Rizwan
PAK vs BAN: शकिब अल हसनने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानला फेकून मारला चेंडू, पंचांनीही घेतला आक्षेप; पाहा VIDEO

एकदिवसीय विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडच्या कोणत्याही गोलंदाजाने असा पराक्रम केला नव्हता आणि असे करून बोल्टने न्यूझीलंडसाठी इतिहास रचला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्येही, बोल्ट डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: भारत-पाक सामन्यापूर्वी शुबमन गिलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पटकावला आयसीसीचा ‘हा’ खास पुरस्कार

डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषक इतिहासातील ही दुर्मिळ कामगिरी करणारा तो सहावा गोलंदाज ठरला. बोल्टने क्रेग मॅकडरमॉट, चामिंडा वास, खुर्रम चौहान, शेल्डन कॉट्रेल आणि कागिसो रबाडा यांसारख्या गोलंदाजांच्या खास स्पेशल क्लबमध्ये सामील झाला आहे.

एकदिवसीय विश्वचषकात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज –

क्रेग मॅकडरमॉट – जॉन राइट – १९९२
चमिंडा वास – हन्नान सरकार – २००३
खुरम चौहान – ब्रेंडन टेलर – २०११
शेल्डन कॉट्रेल – मार्टिन गुप्टिल – २०१९
कागिसो रबाडा – दिमुथ करुणारत्ने – २०१९
ट्रेंट बोल्ट – लिटन दास -२०२३