न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १० जूनपासून सुरू होईल. या कसोटीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट खेळण्याची शक्यता आहे. यापूर्वी बोल्ट इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही, अशी माहिती समोर आली होती. मात्र, क्वारंटाइन कालावधीत सूट मिळाल्यानंतर बोल्ट शेवटच्या कसोटीत सामील होऊ शकतो. ही मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडला भारताविरुद्ध १८ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे.
आयपीएल खेळल्यानंतर ट्रेंट बोल्ट इंग्लंडला न जाता घरी गेला. यामुळे तो पहिला कसोटी खेळू शकला नाही. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टे़ड म्हणाले, ”काही संधी आहेत, कारण काही गोष्टी बदलल्या आहेत. प्रशिक्षण घेण्यासाठी यूके सरकारने बोल्टला परवानगी दिली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय गुरुवारी घेण्यात येईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी गोलंदाजांना तंदुरुस्त ठेवणे संघाला आवडेल.”
हेही वाचा –‘‘क्या गुंडा बनेगा रे तू?”, वसीम जाफरनं ‘या’ कारणामुळं इंग्लंड संघाला डिवचलं
या सामन्यापूर्वी गोलंदाजांना सांभाळणे महत्त्वाचे असल्याचे गॅरी स्टेड यांनी सांगितले. पहिल्या कसोटीत गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीने ४२ आणि काईल जेमीसनने ४१ आणि नील वॅगेनरने ४० षटके टाकली. ट्रेंट बोल्टच्या पुनरागमनानंतर जेमीसन किंवा वॅगेनर यांच्यात फक्त एका गोलंदाजाला संधी मिळेल. डावखुरा फिरकीपटू मिशेल सॅनटनर दुसऱ्या डावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. मात्र, तो सामन्यात विकेट घेऊ शकला नाही. एजाज पटेल किंवा रचिन रवींद्र यांना त्यांच्या जागी संधी मिळू शकेल. इंग्लंडमधील न्यूझीलंड संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे.
हेही वाचा – WTC FINAL : आयसीसीची फॉलो-ऑन नियमासंदर्भात मोठी घोषणा
बोल्टची भारताविरुद्ध कामगिरी
टीम इंडियाविरूद्ध ट्रेंट बोल्टची कामगिरी चांगली राहिली आङे. न्यूझीलंडकडून भारताविरूद्ध सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने तीनही स्वरूपात २५ सामन्यांत ६६ बळी घेतले आहेत. कसोटीविषयी बोलताना बोल्टने भारताविरुद्ध ९ सामन्यांत ३६ बळी घेतले आहेत.