Trent Boult excited to play semi-final match against India: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सामना होऊ शकतो. किवी संघाने शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीपूर्वी किवी संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टही फॉर्ममध्ये परतला आहे. श्रीलंकेच्या फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर बोल्ट म्हणाला की, रोहित शर्माच्या संघाची आक्रमक वृत्ती आम्हाला पराभूत करण्याची संधी देऊ शकते.

साखळी टप्प्यातील सर्व सामने खेळल्यानंतर, न्यूझीलंडचे १० गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट ०.७४३ अधिक आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोल्ट म्हणाला, ‘टीम इंडिया सकारात्मक क्रिकेट खेळत आहेत आणि मला वाटते की शॉट्स खेळल्याने संधी मिळते. पण आम्ही त्या सामन्याला कसे सामोरे जायचे, याबाबत आम्ही स्पष्टपणे तयार असणार आहोत.’ उपांत्य फेरीत भारताचा सामना करण्यासाठी बोल्ट उत्सुक आहे. २०१९च्या विश्वचषकात मँचेस्टरमध्ये दोन्ही संघात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

भारताविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना रोमांचक असेल –

ट्रेंट बोल्टच्या म्हणला, ‘मला वाटते की हे खूप रोमांचक असेल आणि मी म्हटल्याप्रमाणे, दीड अब्ज लोकांसमोर भारताशी स्पर्धा करण्यापेक्षा आणखी मोठे काही असू शकत नाही. होय, उपांत्य फेरीत भारताचा सामना करणे खूप रोमांचक असेल. यजमान भारतीय संघ उत्साहात आहे, चांगले क्रिकेट खेळत आहे. अशा संघाविरुद्ध तुम्हाला चांगली पटकथा लिहण्यासाठी चांगली संधी असू शकत नाही.’ न्यूझीलंडने लीग टप्प्यात एकदा भारताचा सामना केला आहे. धर्मशाला येथे २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चार गडी राखून विजय मिळवला होता.

हेही वाचा – World Cup 2023: “पाकिस्तान जिंदाभाग!…”; न्यूझीलंडच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची सोशल मीडियावर उडवली खिल्ली

पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठणे अशक्य –

बोल्ट भूतकाळात राहत नाही पण उपांत्य फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले, तर भारताविरुद्ध खेळण्याचा अनुभव त्याला उपयोगी पडेल, असे तो म्हणाला. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अशक्य आहे. कारण बाबर आझम अँड कंपनीला अखेरचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल. तसेच धावांचा बचाव करताना इंग्लंड सहा षटकांत रोखावे लागेल. जे जवळपास अशक्य आहे.