वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत शुक्रवारी यजमान विंडीज विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचे दोन प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना मैदानावरच एकमेकांना भिडल्याचे चित्र पहावयास मिळाले. रवींद्र जडेच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनचा झेल सुरेश रैना कडून निसटल्याने जडेजा चिडला आणि थेट रैनाच्या दिशेने चालत गेला. रैनाही आक्रमक रुपात पहायला मिळाला. दोघांमधील वाद विकोपाला जाण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत त्यांना वेगळे केले.
मालिकेतील आव्हान टीकून राहण्यासाठी हा सामना करो या मरो अशी स्थिती होती. त्यामुळे भारतीय संघासाठी जिंकणे महत्वाचे होते आणि शेवटच्या क्षणी वेस्ट इंडिज संघाचा फिरकी गोलंदाज सुनील नरेनचा झेल रैना कडून सुटला. ही गोष्ट जडेला सहन झाला नाही आणि तो बडबडकरत सुरेश रैनाकडे चालत गेला होता. काहीकाळानंतर हा वाद निवळला आणि विजयानंतर हे दोन्ही खेळाडू हसतखेळत मैदानातून तंबूत परतताना दिसले.

Story img Loader