Tripura beat Saurashtra by 148 runs in Vijay Hazare Trophy 2023 : देशांतर्गत क्रिकेटमधील ५० षटकांची सर्वात मोठी स्पर्धा विजय विजय हजारे करंडक स्पर्धेत अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या उपस्थितीत गतविजेत्या सौराष्ट्रला सोमवारी पराभव पत्करावा लागला. विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेतील अ गटातील सामन्यात त्रिपुराविरुद्ध १४८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना त्रिपुराने ५० षटकांत ८ गडी गमावून २५८ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात सौराष्ट्रला ३१.४ केवळ ११० धावा करता आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश सतीश (७४ चेंडूत ७२ धावा), सुदीप चॅटर्जी (९३ चेंडूत ६१ धावा) आणि बिक्रम कुमार दास (७६ चेंडूत ५९ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्रिपुराने आठ गड्यांच्या मोबदल्यात २५८ धावा केल्या होत्या. यानंतर जयदीप देवच्या (१५ धावांत ५ बळी) शानदार गोलंदाजीमुळे सौराष्ट्रचा डाव ३१.४ षटकांत केवळ ११० धावांवर आटोपला.

अनुभवी डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकटने सौराष्ट्रकडून ३५ धावांत पाच विकेट घेतल्या, पण त्याचा संघाला काही फायदा झाला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रला सुरुवातीलाच वेगवान गोलंदाज मूरा सिंग आणि राणा सिंग यांनी दोन मोठे धक्के दिले. त्यामुळे हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन आणि चिराग जानी अवघ्या १३ धावांच्या धावसंख्येपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले. पुजारा (२४) आणि अर्पित वसावडा (१६) यांनी चौथ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी करून संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. विक्रम देबनाथने पुजारा पायचित करुन ही भागीदारी तोडली, त्यानंतर संघाचा डाव संपुष्टात आला.

हेही वाचा – IPL 2024 : अखेर गुजरात टायटन्सनं सांगितलं हार्दिक पंड्याला सोडण्याचं कारण; विक्रम सोलंकी म्हणाले…

गुजरातच्या उर्विल पटेलने ४१ चेंडूत झळकावले शतक –

गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज उर्विल पटेलने ४१ चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत अरुणाचल प्रदेश विरुद्ध चंदीगड येथे झालेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. २०१० मध्ये बडोद्याकडून खेळताना महाराष्ट्राविरुद्ध ४० चेंडूत शतक झळकावताना, भारतासाठी सर्वात वेगवान लिस्ट ए शतक झळकावण्याचा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर आहे. उजव्या हाताचा सलामीवीर उर्विलने आपल्या डावात ९ चौकार आणि ७ षटकार मारले आणि त्याच्या संघ गुजरातने १३ षटकांत १६० धावांचे लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे रविवारी गुजरात टायटन्सने उर्विल पटेलला करारमुक्त केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tri vs sau match updates tripura beat saurashtra by 148 runs in vijay hazare trophy tournament 2023 vbm