भारतीय बॉक्सिंग महासंघाने संघाची सराव चाचणी लांबणीवर टाकल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय बॉक्सर्सच्या समावेशाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
भारतीय बॉक्सर्सची सराव चाचणी १६ आणि १७ ऑगस्टला पतियाळा येथे होणार होती. पण बॉक्सर्सना आणि प्रशिक्षकांना कल्पना न देता ही चाचणी महिनाअखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  भारतावरील ऑलिम्पिक बंदी उठवण्याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांच्यात २५ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीनंतर ही सराव चाचणी आयोजित करणार असल्याचे समजते. मात्र कझाकस्तान येथे ११ ते २७ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर असल्यामुळे बॉक्सर्सची निवड करण्यासाठी फारच कमी वेळ मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा