उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये सोमवारी टायटन्सपुढे आव्हान असेल ते त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाचे. गेल्या तीन सामन्यांमध्ये दोन विजयांसह टायटन्सचा संघ ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यावर टायटन्सच्या संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळेल आणि त्यांना चेन्नई सुपर किंग्जचा सामना करावा लागेल, तर दुसरीकडे त्रिनिदादच्या संघाने हा सामना जिंकल्यास सरासरीच्या जोरावर ‘ब’ गटात उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी चुरस पाहायला मिळेल.
टायटन्सच्या संघाचे कर्णधार हेन्री डेव्हिस आणि जॅक्स रुडॉल्फ हे दोन आधारस्तंभ असून त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. तर सनरायजर्सकडून झालेल्या पराभवातून सावरून त्रिनिदादने ब्रिस्बेनला पराभूत केले आहे. गोलंदाजी हे त्रिनिदादच्या संघाची जमेची बाजू असून रवी रामपॉल आणि सुनील नरिन ही त्यांची प्रमुख दोन अस्त्रे असतील.
सामना १. टायटन्स वि. त्रिनिदाद आणि टोबॅगो
वेळ : दुपारी ४.०० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोट्स-२
सामना २.समनायजर्स हैदराबाद वि. ब्रिस्बेन हीट
वेळ : रात्री ८.०० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोट्स-२

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा