राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा
विरार येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राने १४, १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळवीत तिहेरी मुकुट पटकाविला.
या स्पर्धेतील १९ वर्षांखालील गटात पुण्याच्या ईशा भावे हिने पाच फे ऱ्यांमध्ये पाच गुणांची कमाई करीत सुवर्णपदकासह विशेष पारितोषिकही पटकाविले. पुण्याच्या आकांक्षा हगवणे हिने १४ वर्षांखालील गटात सहा डावांपैकी सहाही डाव जिंकले आणि सुवर्णपदकासह विशेष पारितोषिकाची कमाई केली. औरंगाबादच्या ऋतुजा बक्षी हिने याच गटात सर्वच्या सर्व डाव जिंकून विशेष बक्षीस पटकाविले. महाराष्ट्राने १९ वर्षांखालील मुलांच्या विभागात कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पुण्याच्या शंतनु मिराशी यानेही कांस्यपदकाची कमाई केली. गटवार निकाल : मुली १४ वर्षांखालील-१.महाराष्ट्र, २.आंध्र प्रदेश, ३.गोवा. १७ वर्षांखालील-१.महाराष्ट्र, २.तामिळनाडू, ३.कर्नाटक. १९ वर्षांखालील-१.महाराष्ट्र, २.केरळ, ३.कर्नाटक. मुले-१४ वर्षांखालील-१.दिल्ली, २.तामिळनाडू, ३.आंध प्रदेश. १७ वर्षांखालील-१.आंध्र प्रदेश, २.तामिळनाडू, ३.केंद्रीय विद्यालय. १९ वर्षांखालील-१.तामिळनाडू, २.आंध्र प्रदेश, ३.महाराष्ट्र.

Story img Loader