U19 cricket world champion G Trisha’s tale: अंडर-१९ महिला विश्वचषकामध्ये गोंगाडी त्रिशा ही भारताची नवी स्टार खेळाडू म्हणून समोर आली आहे. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असलेल्या त्रिशा गोंगाडी हिने अंतिम सामन्यात कमालीची कामगिरी केली. त्रिशाने आपल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या वर्ल्डकप विजयाचा पाया रचला. त्रिशाने अंतिम फेरीत ३ विकेट्स घेत ४४ धावांनी नाबाद खेळी केली. यासह तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तर याचबरोबर त्रिशा प्लेअर ऑफ द टूर्नामेंटदेखील ठरली.

अंतिम सामन्यापूर्वीच्या १० डावांमध्ये सलामीवीर त्रिशाने ६४.८ च्या सरासरीने एक शतक, दोन अर्धशतकं आणि दोन वेळा ४० धावांचा टप्पा गाठला. त्रिशाने वयाच्या दुसऱ्या वर्षीच क्रिकेटला सुरुवात केली होती, यामागचं कारण म्हणजे क्रिकेटचं वेड असलेले तिचे वडील. तिच्या वडिलांनी त्रिशाला क्रिकेटचे धडे देत भारताला एक नवी स्टार खेळाडू दिली आहे.

गोंगाडी त्रिशाचा अंडर-१९ टी-२० विश्वचषकात वर्ल्ड रेकॉर्ड

गोंगाडी त्रिशा हिने अंडर-१९ महिलांच्या विश्वचषकात शतक झळकावत मोठा विक्रम रचला. त्रिशापूर्वी अंडर-१९ महिलांच्या टी-२० विश्वचषकात कोणत्याच खेळाडूने शतक झळकावले नव्हते, ते त्रिशाने करून दाखवलं. त्रिशाने स्कॉटलंडविरूद्ध सुपर सिक्स सामन्यात ५७ चेंडूत ११० धावांची दमदार खेळी केली. यासह त्रिशाने संपूर्ण स्पर्धेत विक्रमी ३०९ धावा केल्या, यामुळेच तिला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कारही मिळाला. त्रिशाने हा पुरस्कार तिच्या वडिलांनी समर्पित केला.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्रिशाच्या वडिलांनी तिच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्रिशा मैदानात मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखली जाते, ती फिरकी आणि वेगवान गोलंदाजांविरूद्धही चांगले फटके खेळताना दिसली आहे. त्रिशाच्या मोठे फटके खेळण्याच्या मसल मेमरीबाबत तिच्या वडिलांनी सांगितलं की, “मसल मेमरीमध्ये मोठे फटके आत्मसात करण्यासाठी जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतात. जर लहान वयातच मुलांच्या आजूबाजूला काही गोष्टी सातत्याने होत असतील ते त्या अधिक प्रकर्षाने आत्मसात करतात. त्यामुळे बॅटवर येणारा चेंडू कोणता हे समजेल आणि ते कॉऑर्डिनेशन ती विकसित करेल.”

जेव्हा त्रिशा चार वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला जिममध्ये नेण्यास सुरुवात केली, जिथे ते इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होते. मग त्याने काँक्रीटची खेळपट्टी बनवली आणि भद्राद्री ज्युनियर कॉलेजमध्ये काही नेट बांधले, जिथे त्यांनी तिला किमान एक हजार चेंडू टाकून सराव करून घेतला. पण इतक्या लहान मुलीला एवढं ओझ टाकणारे वडील म्हणून नाव ठेवण्यापूर्वी त्यांनी या सरावामागचं कारण सांगितलं, त्रिशाचे बाबा म्हणाले. “सामान्यतः, सर्वच आठ वर्षांच्या आसपास सरावाला सुरूवात करतात, परंतु त्या टप्प्यावर खूप स्पर्धा सुरू असते. म्हणून मी ती २ वर्षांची झाल्यापासूनच सरावाला सुरूवात केली. एकच आयुष्य आहे आणि मी तिला सर्वोत्तम देण्याचा निर्णय घेतला.”

त्रिशाचे वडील रामी रेड्डी यांनी घेतलेल्या या मेहनतीचं त्रिशाने वर्ल्डकपमध्ये मोठी कामगिरी करत नाव कमावत चीज केलं. तिच्या वडिलांनी सुरूवातीच्या काळात घेतलेल्या मेहनतीमुळेच त्रिशा आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारी पहिली U19 भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आणि ज्युनियर टी-२० विश्वचषकातील भारताची सर्वात मोठी स्टार खेळाडू म्हणून समोर आली.

G Trisha With Her Father
त्रिशा गोंगाडीचा वडिलांबरोबरचा फोटो – (इंडियन एक्स्प्रेस)

२ वर्षांची असताना बॅट दिली हातात

मुली ज्या वयात बाहुली आणि भातुकलीचा खेळ खेळतात त्या वयात २ वर्षांच्या त्रिशाला तिच्या वडिलांनी प्लास्टिकची बॅट आणून दिली. वडील तिला प्लॅस्टिक किंवा मऊ टेनिस बॉलने गोलंदाजी करायचे, जेणेकरून बॅटने तो गोलाकार चेंडू बाजूला करणे हे तिच्या सुरूवातींच्या सवयींमध्ये तिच्या डोक्यात पक्क होईल.

आपल्या लेकीला क्रिकेट स्टार बनवण्याचे स्वप्न तिच्या वडिलांच्या स्वतःच्या क्रीडापटू होण्याच्या अपयशातून साकार केले. हैदराबादसाठी अंडर-१६ स्तरावरील हॉकीपटू असणाऱ्या तिच्या वडिलांनी तेलंगणाच्या राजधानीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या भद्राचलम शहरात गेल्यानंतर त्यांनी क्रीडापटू होण्याच्या स्वप्नावर पूर्णविराम लावला. या शहरातील क्रिकेट सुविधा मूलभूत होत्या, परंतु तिचे वडिल रेड्डी यांनी तिला फिट ठेवण्यासाठी अनेक कष्ट घेतले. “मी तिच्या सरावाला लवकर सुरुवात केली आणि तिच्या सांध्यावर जास्त भार पडणार याची खात्री घेतली. मी हे सर्व शास्त्रोक्त पद्धतीने केलं,” असं रेड्डी म्हणाले.

त्रिशाचा सराव आणि डाएट

मुख्य म्हणजे त्रिशाच्या आहाराची देखील त्यांनी तितकीच काळजी घेतली. प्रोटिन आणि न्यूट्रिएंटसचा ताळमेळ असलेला त्यांनी एक डाईट चार्ट तयार केला. तिच्या आहारात कोणतेही सप्लिमेंट्स नव्हते, सर्व पदार्थ हे घरगुती होते. ती लहानपणापासूनच खूप खेळायची आणि सराव करायची म्हणून आम्हाला भरपूर प्रोटिने असलेले पदार्थ तिला देत असू,” असं रेड्डी पुढे म्हणाले.

त्रिशाला क्रिकेटपटू बनवण्याची तिच्या वडिलांमध्ये इतकी जिद्द होती की त्यांनी तिला काही काळ शाळेत पाठवले नाही आणि खाजगी शिकवणीची व्यवस्था केली. “मला वाटले की यामुळे तिच्यावर अधिक दबाव येईल. शेवटी जेव्हा ती शाळेत जाऊ लागल तेव्हा ती तीन तास शाळेत जायची आणि दिवसातील सहा-आठ तास क्रिकेटला द्यायची. जर ती ऑर्थोडॉक्स शालेय शिक्षण पद्धतीत राहिली असती तर ती तिच्या देशासाठी खेळण्याची शक्यता फारच कमी होती.”

त्रिशाचा क्रिकेट प्रवास

जेव्हा ती ११ वर्षांची होती, तेव्हा त्रिशाच्या वडिलांनी तिला हैदराबादमधील प्रसिद्ध सेंट जॉन क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले, हैदराबादमध्ये त्रिशाचे आजी-आजोबा राहत असत. काही वेळातच, तिचे वडील देखील नोकरी सोडून हैदराबादला गेले. “माझ्या सासऱ्यांना तिला सराव सत्रात घेऊन जाणं कठीण जात होतं. एकदा सरावाला जाताना त्यांचा किरकोळ अपघात झाला आणि त्यानंतर मी हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला,” असे तिच्या वडिलांनी पुढे सांगितले .

व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मिताली राज सारख्या दिग्गजांना तयार करणाऱ्या या अकादमीमध्ये तिच्या हात आणि डोळ्यांचं समन्वय पाहून प्रशिक्षक जॉन मनोज यांना धक्का बसला. ती इतकी चांगली फलंदाज होती की तिने वयापेक्षा मोठ्या वयोगटातील संघांमध्ये खेळायला सुरुवात केली. ती आठ वर्षांची असताना हैदराबादकडून अंडर-१६ सामने खेळली. ११ व्या वर्षी ती U-19 आणि U-23 खेळली, १२ व्या वर्षी तिने वरिष्ठ संघासाठी खेळायला सुरुवात केली आणि ती १३ वर्षांची असताना भारताने NCAचं फिरकी शिबिर आयोजित केलं,” मनोज सांगतो.

वयाच्या दुसऱ्या वर्षापासून टेनिस बॉलवर फटके मारण्याच्या सरावामुळे तिच्या वरच्या हाताची पकड आणि तिच्या कौशल्यावरील पूर्ण निष्ठा यामुळेच ती मोठमोठे फटके खेळू शकते. या सरावामुळे तिला लेंग्थ समजून घ्यायला तिला मदत होते, असं अकादमीमधील कोच मनोज म्हणाले. कोच मनोज यांनी बोलताना विचारले की, “वयाच्या १६ व्या वर्षी सचिन तेंडुलकरने देशासाठी का पदार्पण केले?” ते थांबले आणि म्हणाे: “कारण तो अपवाद होता. आणि ही मुलगीदेखील एक अपवाद आहे.

त्रिशाने तिच्या फलंदाजीबाबत बोलताना सांगितलं होतं की मिताली राजला ती तिचा आदर्श मानते आणि तिच्याप्रमाणे फटके खेळू पाहते. भारताची ही माजी खेळाडू मिताली राजदेखील अकादमीमध्ये तिची फलंदाजी पाहून चकित झाली होती. यावर मिताली म्हणाली होती, ती भविष्यात चांगली कामगिरी करताना दिसेल. ही माहिती मनोज यांनी दिली.

Story img Loader