वॉशिंग्टन : अमेरिकेत आता पारलिंगी (ट्रान्सजेंडर) खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जन्मत:च पुरुष असताना लिंगबदल करुन घेणाऱ्या खेळाडू महिला किंवा मुलींच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून रोखण्याचा निर्णय अमेरिकेत घेण्यात आला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिकडेच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान अल्जेरियाची बॉक्सिंगपटू इमाने खलिफच्या पदकापर्यंतच्या वाटचालीत वादग्रस्त ठरला होता. इमानेवर पारलिंगी असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच कारणाने इटलीच्या अँजली कॅरिनीने इमानेविरुद्ध उपांत्यपूर्व लढत खेळण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे २०२३ मध्ये इमानेला लिंग चाचणी देण्यास नकार दिल्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले होते.

तेव्हा पासून पारलिंगी खेळाडूंच्या सहभागावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिका घेत असलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो. राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांनी पुरुष किंवा महिला असल्याचे जाहीर करावे आणि तसा पारपत्रांवर स्पष्ट उल्लेख करावा असा व्यापक आदेश जारी केला होता. खेळामध्ये लिंग समानता राखण्याचा आणि लैंगिक छळ रोखण्याची आपली भूमिका स्पष्ट करणारा एक आदेश ट्रम्प सरकारने जारी केला आहे.