Nathan Lyon Strategy for Rishabh Pant : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लॉयनने ऋषभ पंतचे कौतुक केले. त्याचबरोबर त्याने पंतसाठी आपली योजना काय असेल हे सांगितले आहे. ऋषभ पंतला गोलंदाजी करताना त्याच्याकडे चुकीला माफी नसते. कारण भारताच्या या युवा फलंदाजाकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणेही उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे.
टीम इंडिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दोऱ्यातील कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरूवात होणार आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतासाठी ऋषभ पंत फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याला क्रीजमध्ये ठेवण्याची योजना असल्याचे नॅथन लॉयनने म्हटले आहे.
नॅथन लॉयन ऋषभबद्दल काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना नॅथन लॉयन म्हणाला, “तुम्ही ऋषभ पंतसारख्या खेळाडूविरुद्ध गोलंदाजी करत असता, तेव्हा तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्याच्याकडे जगातील सर्व कौशल्ये आहेत. एक गोलंदाज म्हणून, तुमच्या चुकीला त्याच्याकडे माफी नसते. त्यामुळे तुम्हाला चुका करणे टाळावे लागते. जर माझ्या चेंडूवर षटकार मारला गेला, तर ते गोलंदाज म्हणून आव्हान असते. मला षटकार पडण्याची भीती वाटत नाही. माझ्यासाठी आव्हान हे आहे की, फलंदाजांना संधी देणे आणि ऋषभसारख्या खेळाडूला क्रीजमध्ये ठेवणे. तसेच संभाव्यत: माझ्याविरुद्ध बचावात्मक खेळायला लावणे आणि या दरम्यान विकेट्सची संधी निर्माण करणे. अशी माझी रणनीती असते.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी मालिकेतील ऋषभ पंतची कामगिरी –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी मालिकेत ऋषभ पंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने १२ डावात ६२.४० च्या सरासरीने ६२४ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १५९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. डिसेंबर २०२२ मध्ये रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर २६ वर्षीय खेळाडूने अलीकडेच बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. चेन्नईत खेळल्या गेलेल्या पुनरागमन कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले. आयपीएल २०२४ पासून तो सतत व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे. गेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पंतने एकहाती सामना फिरवला होता.