Twenty20 World Cup Women India क्वेबेऱ्हा (दक्षिण आफ्रिका) : रेणुका सिंहच्या (१५ धावांत ५ बळी) भेदक गोलंदाजीनंतरही इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश राखण्यात अन्य गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळे भारताला शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २९ धावसंख्येवरून इंग्लंडने ७ बाद १५१ धावांची मजल मारली. त्यानंतर भारताचा डाव ५ बाद १४० असा मर्यादित राहिला. स्मृती मानधनाने (४१ चेंडूंत ५२ धावा) आणि रिचा घोषने (३४ चेंडूंत नाबाद ४७ धावा) केलेले प्रयत्न तोकडे पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तत्पूर्वी, डावात पाच गडी बाद करणाऱ्या रेणुकाने सुरुवातीलाच ‘पॉवरप्ले’ च्या षटकांत इंग्लंडला ३ बाद २९ असे अडचणीत आणले होते. त्यानंतर इंग्लंडला नॅट स्किव्हर-ब्रंट (४२ चेंडूंत ५० धावा) आणि अॅमी जोन्सच्या (२७ चेंडूंत ४० धावा) फलंदाजीने आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. नॅटच्या तुलनेत ॲमी अधिक आक्रमक खेळली. या दोघींनी केलेल्या फटकेबाजीमुळेच इंग्लंडचे आव्हान उभे राहिले. मात्र, अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा रेणुकाने इंग्लंडला अधिक धावा करू दिल्या नाहीत. नॅटने प्रथम कर्णधार हेदर नाईट (२८) हिच्यासह ५१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा घसरला.

भारताला इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करणे जमले नाही. स्मृती मानधनाची सुरुवातीची अर्धशतकी खेळी आणि अखेरीस रिचा घोषची फटकेबाजी भारताचा पराभव वाचवू शकली नाही. स्मृतीने खेळपट्टीच्या वेगाशी स्वत:ला चांगले जुळवून घेतले होते; पण इंग्लंड कर्णधार नाईटने सामन्याच्या परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय कमालीचे यशस्वी ठरले. अतिशय नियोजनबद्ध मारा इंग्लंडच्या गोलंदाजांनी केला. सोफी एक्लेस्टोनने टाकलेले १९वे षटक निर्णायक ठरले. या षटकात तिने केवळ ३ धावा दिल्या आणि तेथेच रिचा घोष खेळपट्टीवर असूनही भारताचा पराभव निश्चित झाला. अखेरच्या षटकात भारतासमोर ३१ धावांचे आव्हान होते. रिचा, पूजा जोडीने १९ धावा घेतल्या. स्मृतीने आपल्या खेळीत सात चौकार, एक षटकार मारला. तर, रिचाने चार चौकार व दोन षटकार लगावले.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २० षटकांत ७ बाद १५१ (नॅट स्किव्हर-ब्रंट ५०, ॲमी जोन्स ४०, हेदर नाईट २८; रेणुका सिंह ५/१५) वि.वि. भारत : २० षटकांत ५ बाद १४० (स्मृती मानधना ५२, रिचा घोष नाबाद ४७; सारा ग्लेन २/२७)