टी२० विश्वचषकाआधीच भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखण्यामुळे विश्वचषकच काय तर पुढचे पाच ते सहा आठवडे खेळू शकणार नाही. आधी रवींद्र जडेजा आणि आता जसप्रीत बुमराह या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतासाठी हे विश्वचषक जिंकणे अवघड होणार आहे.

दरम्यान, ही बातमी आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. भारतीय संघासाठीही ही चिंताजनक बाब आहे.

या घोषणेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. काही नेटकरी म्हणतायत की आता भारताने टी२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न विसरून जावे. सोशल मीडियावर कोणकोणते मीम्स व्हायरल झाले आहेत, पाहुयात.

प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानंतर तिला मनवण्यासाठी मुलानं केलं असं काही… Viral Video पाहून आवरणार नाही हसू

टी२० विश्वचषक सुरु होण्यासाठी केवळ दोन आठवडे बाकी राहिले आहेत. त्यातच भारतीय संघाचे महत्त्वाचे दोन खेळाडू रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह दुखापतींमुळे या चषकातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यानंतर आता कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड कोणती नऊ योजना आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader