World Cup 2023 know where you can watch all the matches for free: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची १३ वा हंगाम ५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. उद्घाटनाचा सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून याच मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. भारताने १९८३ आणि २०११ मध्ये विजेतेपद पटकावले होते. मागच्या वेळी जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली तेव्हा वर्ल्ड कप भारतातच आयोजित करण्यात आला होता. अशा स्थितीत यावेळीही संघाकडून विजेतेपदाच्या अपेक्षा आहेत.

विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. १० पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण

विश्वचषक कधी आणि किती दिवस होणार?

विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

हेही वाचा – ICC Cricket World Cup 2023: आता मॅचेस बघताना मिळणार नवीन अनुभव; Disney+ Hotstar ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट फिचर

विश्वचषक स्पर्धेत किती संघ सहभागी होत आहेत?

विश्वचषक स्पर्धेत १० संघ सहभागी होत आहेत. यजमान भारताशिवाय श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि इंग्लंड हे संघ भाग घेत आहेत.

विश्वचषकाचे उद्घाटन आणि अंतिम सामना कुठे होणार आहेत?

विश्वचषकाचा ​​सलामीचा सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – Asian Games: तिरंदाजीमध्ये ओजस-ज्योती जोडीने सुवर्णपदक जिंकताच भारताने रचला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

भारताचा पहिला सामना कधी आणि कोणाविरुद्ध होणार?

भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबरला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

भारतात विश्वचषक सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे उपलब्ध असेल?

तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर विश्वचषक सामने ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला मोबाईलवर सामना मोफत पाहता येणार आहे. लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील आणि सदस्यता घ्यावी लागेल.

Story img Loader