Two Embarrassing Record of IP History : आयपीएल २०२२ चा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पडल्याने चाहत्यांचं जबरदस्त मनोरंजन झालं होतं. पण या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. आरसीबीचं नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे सोपवण्यात आलं होतं. या सामन्यात आरसीबीने २०५ धावा कुटल्यानंतरही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसंच या पराभवासोबत आरसीबीच्या नावावर दोन लाजिरवाण्या विक्रमांची नोंदही झाली. हे विक्रम अन्य कोणत्याही संघ्याच्या नावावर नोंदवण्यात आले नाहीत.

RCB च्या नावावर या लाजिरवाण्या विक्रमांची नोंद

आरसीबीच्या खेळाडूंची फलंदाजी आयपीएलमध्ये नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहे. पण आरसीबीच्या गोलंदाजीबाबत अनेकदा टीका-टीप्पणी करण्यात आली. या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी फ्लॉप ठरली आणि संघ २०६ धावा डिफेंड करण्यातही अपयशी ठरला. या पराभवासोबत आरसीबीने आयपीएलच्या एका इनिंगमध्ये सर्वात जास्त वाईड चेंडू फेकण्याचा अनोखा विक्रम केला. हा लाजिरवाणा विक्रम याआधी पंजाब किंग्जच्या नावावर होता. पंजाबने एका सामन्यात १९ वाईड चेंडू फेकले होते. पण आरसीबीने या सामन्यात एकूण २१ वाईड चेंडू टाकले आणि हा विक्रम त्यांच्या नावावर करून घेतला.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Success Story Of Anudeep Durishetty In Marathi
Success Story Of Anudeep Durishetty : गूगलची सोडली नोकरी, UPSC परीक्षेत तीन वेळा आलं अपयश; वाचा, देशात पहिला आलेल्या अनुदीप दुरीशेट्टीची गोष्ट
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

नक्की वाचा – IPL मध्ये ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंनी एकही षटकार ठोकला नाही; नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

२००+ धावा करून आरसीबीचा झाला चौथा पराभव

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि पंजाब किंग्जच्या सामन्यात आरसीबीने आणखी एका लाजिरवाण्या विक्रमाला गवसणी घातली. सामन्यात प्रथम फलंदाजी करत आरसीबीने २०५ धावा केल्या होत्या, तरीही या सामन्यात त्यांचा पराभव झाला. आयपीएल इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला २०० हून अधिक धावा करूनही चारवेळा पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीच्या विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने २ वेळा २०० हून अधिक धावांचं लक्ष्य गाठलं आहे. तसंच कोलकाता नाईट रायडर्सनेही आरसीबीच्या विरुद्ध हा कारनामा केला आहे.

Story img Loader