स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा
एका वर्षांत सर्वाधिक गोल करण्याची करामत करणाऱ्या लिओनेल मेस्सीने आणखी दोन गोलांची भर घातली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत कोडरेबावर २-० असा विजय मिळवला.
डेव्हिड व्हिलाने ११व्या मिनिटाला मेस्सीकडे चेंडू पास केल्यानंतर त्याने कोणतीही चूक न करता चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर अ‍ॅलेक्स सान्चेझने रचलेल्या कामगिरीवर मेस्सीने ७४व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावला. मेस्सीने या वर्षांतील आपली गोलसंख्या ८८ वर नेली. जर्मनीचे महान फुटबॉलपटू गेर्ड म्युलर यांच्यापेक्षा तीन अधिक गोल मेस्सीच्या नावावर आहेत.