देशात सुरु असलेल्य्य करोना संकटाचा धसका आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी घेतला आहे. राजस्थान रॉयल्सच्या अँड्र्यु टाय हा ऑस्ट्रेलियात परत गेल्यानं अजून दोन खेळाडूंनी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी स्पर्धा सोडण्याचं जाहीर केलं आहे. अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन आयपीएलमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळत होते. बंगळुरुने ट्वीट करत हे दोन खेळाडू स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. ‘अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन दोघेही वैयक्तिक कारणांसाठी ऑस्ट्रेलियात परतले आहेत. यापुढच्या सामन्यात ते खेळणार नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्या निर्णयाचा सन्मान करते. त्यांना संपूर्ण मदतही करत आहे’, असं ट्वीट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने केलं आहे.

भारतातील करोना स्थिती पाहता खेळाडू एक एक करत स्पर्धेतून माघार घेत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. कुटुंबाला करोनाची लागण झाली असल्याने आर अश्विनने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या हंगामातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये सनरायजर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर आर अश्विनने ट्विट करत ही माहिती दिली.

अँड्र्यु टाय मायदेशी गेल्यानं राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या जाण्यानं राजस्थान संघात आता चार परदेशी खेळाडू उरले आहेत. त्यात जोस बटलर, ख्रिस मॉरिस, डेविड मिलर आणि मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश आहे.

राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का; चौथ्या परदेशी खेळाडूनं सोडली साथ

या स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल याला करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर संघात पुनरागमन केलं आहे. त्याचबरोबर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे देशातील करोना स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

Story img Loader