Mca To Auction 2 Seats Where Mahendra World Cup 2011 Winning Six Landed: भारत यंदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. याआधी, भारताने शेवटच्या वेळी विश्वचषकाचे आयोजन २०११ मध्ये केले होते, जेव्हा टीम इंडिया २८ वर्षांची प्रतीक्षा संपवून चॅम्पियन बनली होती. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षटकार चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षटकाराचा चेंडू ज्या बाकड्यांवर पडला होता, आता त्या बाकड्यांचा लिलाव होणार आहे.

दोन्ही बाकड्यांवर धोनीचे नाव टाकले जाणार –

भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यातील ४९ वे षटक टाकण्यासाठी चेंडू नुवान कुलसेकरा आला होता. षटकातील दुसऱ्याच चेंडूवर धोनीने त्याच्याच शैलीत षटकार ठोकला. धोनीच्या षटकाराचा चेंडू ज्या दोन बाकड्यावर पडला त्यांना ‘२०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स’ म्हणतात. असाच अहवाल यावर्षी एप्रिलमध्ये आला होता. या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी त्या बाकड्यांचा लिलाव करणार असल्याची माहिती एमसीएच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. जे लोक लिलाव जिंकतील त्यांना विशेष आदरातिथ्य पॅकेज दिले जाईल. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या दोन बाकड्यांची किंमत करोडोंपर्यंत पोहोचू शकते.

uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल
Dharavi Assembly Constituency election Dharavi Redevelopment Mumbai print news
‘धारावी बचाव’चा कार्यकर्ता रिंगणात; मतदारसंघातून गायकवाड कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढणार ?
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले की, बाकड्यांवर कोणतेही स्मारक होणार नाही. या सीट्स एस धोनीच्या नावाने डिझाइन केल्या जातील आणि कायमचे एमएस धोनी सीट्स म्हणून ओळखले जातील. या बाकड्यांना सुशोभित करण्यात येणार असून या जागा सोफ्यासारख्या असतील. या सीटसाठी तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतील.

हेही वाचा – SL vs PAK: पावसाने वाढवली पाकिस्तान-श्रीलंका संघाची धाकधूक, सामना रद्द झाल्यास कोण जाणार फायनला? जाणून घ्या समीकरण

सचिन तेंडुलकरच्या स्टँडमधील विकले जाणार बाकडे-

वर्ल्ड कप २०२३ साठी, एमसीए सचिन तेंडुलकरच्या लेव्हल डी च्या ३०० बाकडे ३ कोटी रुपयांना विकत आहे, तसेच सात बॉक्सच्या १४० सीट्स २.६६ कोटी रुपयांना विकणार आहे. विश्वचषकाचे पाच सामने मुंबईतील वानखेडे येथे होणार आहेत. गेल्या वेळी अंतिम सामना वानखेडेवर खेळला गेला होता, परंतु यावेळी विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.