गीता फोगट व बजरंग यांच्या रौप्यपदकांसह भारताने अमेरिकेतील डेव्ह शूल्ट्झ स्मृती चषक कुस्ती स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली. गीताला ५९ किलो गटाच्या अंतिम लढतीत चीनच्या हुई लुई हिच्याविरुद्ध दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. पुरुषांच्या ६० किलो गटात डेव्हिन कार्टर याने बजरंग याला अंतिम फेरीत हरविले. ५५ किलो गटात संदीप तोमर याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गतवर्षी ५५ किलो गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमितकुमार याला यंदा या स्पर्धेतील दुसऱ्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. भारताचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशीलकुमार याने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.

Story img Loader