New Zealand Women U19 vs Nigeria Women U19 Highlights in Marathi: क्रिकेटच्या मैदानात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. महिलांच्या १९ वर्षाखालील विश्वचषकामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान नायजेरियन संघाने न्यूझीलंड महिला संघाचा पराभव केला. नायजेरियाच्या साधारण संघाने न्यूझीलंडच्या महिला संघाचा पराभवाचा मोठा दणका दिला आहे. या रोमांचक सामन्यात नायजेरियाने अवघ्या २ धावांनी विजय नोंदवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नायजेरियाचा संघ पहिल्यांदाच १९ वर्षांखालील महिलांचा विश्वचषक खेळण्यासाठी उतरला आणि पहिल्याच मोसमात त्यांनी न्यूझीलंडला पराभवाचा दणका देत सर्वांना चकित केलं आहे. न्यूझीलंड हा मोठा संघ असून नायजेरियाने मिळवलेला हा विजय त्यांच्या वर्ल्डकप मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा –VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं?

न्यूझीलंड अंडर-१९ महिला संघ आणि नायजेरिया अंडर-१९ महिला संघ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये केवळ १३ षटकांचा सामना खेळवा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नायजेरिया संघाने १३ षटकांत ६ गडी गमावून ६५ धावा केल्या.

हेही वाचा – Rohit Sharma Video: रोहित शर्माचा ब्रेकडान्स, श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी केली हटके डान्स स्टेप, वानखेडेच्या कार्यक्रमातील VIDEO व्हायरल

न्यूझीलंडचा संघ १३ षटकांत अवघ्या ६६ धावाही करू शकला नाही आणि १३ षटकांत ६ विकेट्स गमावून ६३ धावा केल्या आणि नायजेरियाने अशारितीने २ धावांनी सामना जिंकला. नायजेरियाकडून पराभूत झाल्यानंतर आता न्यूझीलंड संघाला पुढच्या फेरीत जाणं कठीण झालं आहे. प्रत्येक गटातून फक्त २ संघ स्पर्धेच्या पुढील फेरीत जातील. त्यामुळे सलग दोन पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडच्या अंडर-१९ महिला संघासाठी पुढील फेरी गाठणं कठीण असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडला आता ग्रुप स्टेजमध्ये आणखी एक सामना खेळायचा आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

तर नायजेरियाच्या संघाने २ सामन्यांपैकी १ सामना जिंकला आहे तर एका सामन्यात पराभव पत्कराव लागला आहे. यासह नायजेरियाच्या संघ त्यांच्या गटात ३ गुणांसह अव्वल स्थानी आहे. नायजेरियाला पुढील सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरूद्ध खेळायचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U 19 womens t20 world cup 2025 nigeria defeats new zealand by just runs big upset in cricket history bdg