मुंबई आणि पुणे या सख्या शेजाऱ्यांमध्ये रंगलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेच्या मुकाबल्यात यू मुंबा संघाने पुणेरी पलटणचा ४४-२८ असा धुव्वा उडवला. अन्य लढतीत प्रेक्षकांचा पाठिंबा असूनही घरच्या मैदानावर दबंग दिल्ली संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पाटणा पायरेट्स संघाने दिल्लीवर ३६-३१ अशी मात केली.  यू मुंबईच्या शबीर पथपालेमला सवरेत्कृष्ट चढाईपटूच्या तर जीवा कुमारला सवरेत्कृष्ट बचावपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. जबरदस्त फॉर्मात असलेल्या यू मुंबा संघाने ९-१ अशी दमदार आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत त्यांनी ही आघाडी १८-१७ अशी वाढवली. दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटणच्या कमकुवत बचावाचा फायदा उठवत यू मुंबाने झंझावाती खेळ करत विजय साकारला. या विजयासह यू मुंबा संघाने २८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले. दिल्ली-पाटणा लढतीत वासीम साजीदला सवरेत्कृष्ट बचावपटू तर रवी दलाल सवरेत्कृष्ट चढाईपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U mumba beat pune palton in pro kabaddi league