U19 ENG vs SA Jorich van Schalkwyk injured video viral : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-१९ कसोटी सामन्यातील अनोख्या पद्धतीच्या रनआऊटचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे या सामन्यात एक फलंदाज अतिशय विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. मात्र, यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षक थोडक्यात वाचला, ज्यामुळे मोठा अपघात टळला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्यन सावंतच्या रनआऊटचा व्हिडीओ व्हायरल –

सामन्यादरम्यान आर्यन सावंत इंग्लंडकडून फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेचा जेसन रौबेनहायमर त्याच्यासमोर गोलंदाजी करायला आला. त्यानंतर जेसनच्या एका चेंडूवर आर्यनने स्वीप शॉट मारला. हा शॉट अतिशय वेगवान होता आणि चेंडू दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक झोरिच व्हॅन शाल्क्विकच्या हेल्मेटला लागला. क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला आदळल्यानंतर चेंडू माघारी येत स्टंपवर धडकला. यावेळी इंग्लंडचा फलंदाज आर्यन सावंतही क्रीझच्या बाहेर होता. ज्यामुळे यष्टिरक्षकाच्या अपीलनंतर तिसऱ्या पंचाने फलंदाजाला बाद घोषित केले.

झोरिच व्हॅन शाल्क्विक दुखापत –

मात्र, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला नसून त्याच्या गुडघ्याला लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. गुडघ्याला चेंडूचा जबर मार लागल्याने क्षेत्ररक्षक झोरिच व्हॅन शाल्क्विक जमिनीवर कोसळा. त्यानंतर सर्व खेळाडू त्याच्याकडे धावले. यानंतर झोरिच व्हॅन शाल्क्विकला पाहण्यासाठी फिजिओला मैदानावरच यावे लागले. त्यानंतर थोड्या वेळाने झोरिच व्हॅन शाल्क्विक पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला. मात्र, हा फटका मारल्यानंतर फलंदाज आर्यन बराच वेळ क्रीजवर उभा राहिला होता.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २९९ धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ३१९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या संघाने ३३६ धावा करून डाव घोषित केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३१७ धावांचे लक्ष्य होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U19 eng vs sa aaryan sawant run out and jorich van schalkwyk injured video viral vbm