पिंपरी-चिंचवडचा युवा क्रिकेट खेळाडू पवन शाह याने अथक प्रयत्न आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करत १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान मिळवले आहे. त्याची केवळ संघातच निवड झाली नाही तर त्याने संघाच्या कर्णधारपदालाही गवसणी घातली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात आणखी भर पडली असून मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. युवा क्रिकेटपटू पवन शाह याचे कौतुक सध्या महाराष्ट्रात होत आहे. मात्र यामागे पवनचे अथक प्रयत्न, मेहनत आणि आर्थिक परिस्थितीवर केलेली मात हे सारे वाखाणण्याजोगी आहे.
वयाच्या दहाव्या वर्षापासून पवन शाह याने पिंपरी-चिंचवडच्या वेंगसरकर अकादमीत क्रिकेटचा श्रीगणेशा केला. पवनला लहानपणापासूनच क्रिकेट खूप आवडायचे. क्रिकेट खेळायला सुरूवात केल्यावर पहिल्याच वर्षी १४ वर्षे वयोगटातील क्रिकेट संघाच्या विरोधात १० वर्षीय पवन मैदानात उतरला होता. त्या सामन्यात त्याने चुणूक दाखवत बाऊन्सरचा सामना केला होता. त्या ठिकाणाहून त्याचा क्रिकेटचा खरा प्रवास सुरु झाला. प्रशिक्षक मोहन जाधव यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. पवनचे वडील हुकूम हे एका खासगी कंपनीत कामाला असून त्यांना महिन्याकाठी १२ ते १५ हजार रुपये मिळतात. याच तुटपुंज्या पैश्यांवर संसाराचा गाडा चालवत आहेत. पवनचे कुटुंब हे भाड्याच्या खोलीत राहात असून त्यांना महिन्याकाठी ६ हजार रुपये भाडे द्यावे लागते. क्रिकेट हा महागडा खेळ असून पवनच्या डायटचा खर्चदेखील हजारोच्या घरात आहे. मात्र तरीही वडिलांनी त्याला काहीच कमी पडू दिले नाही. अनेक वेळा पैश्यांअभावी बॅट नसायची तर फाटलेले ग्लोज,खराब झालेले पॅड हे युवा क्रिकेटपटू पवन शाह याने वापरले असल्याचे त्याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना सांगितले.
गरीब परिस्थितीची पवनला जाण होती. त्याने खूप मेहनत घेतली म्हणूनच तो आज १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करत असून कर्णधार आहे. श्रीलंका दौऱ्यावर पवनची निवड झाली होती. पहिल्या कसोटी सामन्यात दबाव असल्याने तो फार धावा करू शकला नाही. परंतु त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात ३२२ चेंडूत २८२ धाव करत बीसीसीआयचे लक्ष वेधले. यामुळेच त्याला कर्णधारपदही मिळाले आहे. त्याला आता आपल्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकायचा आहे. त्यासाठी त्याने मोर्चेबांधणी केली आहे. वैयक्तिक कामगिरीपेक्षा खेळाडूंना एकत्र घेऊन जायचे आहे. माजी कर्णधार महेंद्र धोनी हा त्याचा आवडता खेळाडू आहे, असेही पवन म्हणाला.
नेहमी जमिनीवर पाय ठेवून असले पाहिजे. ग्लॅमरला बळी पडू नये, असा सल्ला प्रशिक्षक मोहन जाधव यांनी पवनला दिला आहे. तर पवन हा पहिल्यांदा गणपती बाप्पासारखा जाडा होता, पण त्याच्यावर मेहनत घेऊन आता तो बजरंग बली झाला आहे, असे फिटनेस ट्रेनर विजय पाटील यांनी सांगितले.
[bc_video video_id=”5830499151001″ account_id=”5798671096001″ player_id=”default” embed=”iframe” padding_top=”56%” autoplay=”” min_width=”640px” max_width=”640px” width=”640px” height=”360px”]
श्रीलंका दौऱ्यावर पवनची निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासारखी क्रिकेट किट पवनकडे नव्हती. प्रशिक्षक मोहन जाधव यांनी पैसे जमा केले होते. मात्र किट खूप महाग असल्याने अखेर प्रशिक्षक जाधव यांचे मित्र यांच्या सहकार्याने एका कंपनीने त्याला जाहिरातीसाठी करारबद्ध केले. कोणतीही क्रिकेटची पार्श्वभूमी नसताना त्याने यशाला गवसणी घातली आहे. पवनच्या क्रिकेटसाठी आणि घरातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी पवनची मोठी बहीण ही कराटे क्लास घेत होती. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. त्यामुळे पवनने कुटुंबातील सदस्यांचेही आभार मानले आहेत.