पिंपरी-चिंचवडचा युवा क्रिकेट खेळाडू पवन शाह याने अथक प्रयत्न आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करत १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान मिळवले आहे. त्याची केवळ संघातच निवड झाली नाही तर त्याने संघाच्या कर्णधारपदालाही गवसणी घातली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात आणखी भर पडली.
आज १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणाऱ्या पवनची श्रीलंका दौऱ्यावरही निवड झाली होती. श्रीलंका दौऱ्यावर असताना पवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात अर्जुन तेंडुलकरही खेळला. त्याच्याबद्दल बोलताना पवन म्हणाला की अर्जुन अगदी नम्र आहे. लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना पवनने अर्जुन तेंडुलकरबद्दल आपले मत व्यक्त केले.
पहिल्या कसोटी सामन्यात दबाव असल्याने तो फार धावा करू शकला नाही. परंतु त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात ३२२ चेंडूत २८२ धाव करत बीसीसीआयचे लक्ष वेधले. यामुळेच त्याला कर्णधारपदही मिळाले आहे. त्याला आता आपल्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकायचा आहे. त्यासाठी त्याने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे, असेही त्याने सांगितले.