U-19 World Cup: पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचे तिकीट अमेरिकेने निश्चित केले आहे. अमेरिकेने सहा सामन्यांतून पाच विजयांसह अमेरिकन झोन पात्रता स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून विश्वचषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही संघाचे गुण हे १० आहेत परंतु, कॅनडाचा रनरेट हा अमेरिकेपेक्षा कमी असून त्यामुळे ते मागे पडले.

क्रिकेटने अमेरिकेत पाय पसरायला सुरुवात केली आहे, हे म्हणण्याचे कारण म्हणजे यूएस अंडर-१९ संघाने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२४ साठी पात्र ठरून इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या अंडर-१९ संघाने प्रथमच ही कामगिरी केली आहे, ही त्यांच्यासाठी मोठी घडामोड आहे. युनायटेड स्टेट्सने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी सहा पैकी पाच पात्रता जिंकली आहेत.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : ‘केसरी’च्या बातमीबद्दल शंकेस वाव
Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?

यूएसए क्वालिफायरच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात यूएसएने बर्म्युडाचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात संघाला कॅनडाकडून पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या सामन्यात पुन्हा बर्म्युडाला पराभूत केल्यानंतर अमेरिकेने अर्जेंटिनाचा सलग दोन गेममध्ये पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. बर्म्युडाविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेच्या अंडर-१९ संघाने प्रथम फलंदाजी करताना ५१५ धावा केल्या होत्या. त्यानंतर विरोधी संघाला ५० धावांत गारद करून ४५० धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे संघाची धावगती ही सर्वोत्तम होती. हेच कारण कॅनडाला मागे टाकण्यात महत्वाचे ठरले.

हेही वाचा: Pakistan Team: भरघोस पगारवाढीनंतरही बाबर आझमसह पाकिस्तानी संघ PCB नाराज, करार करण्यास नकार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमेरिकेला विश्वचषकाचे तिकीट मिळाले

पात्रता स्पर्धेत अमेरिकेने बर्म्युडा आणि अर्जेंटिनाचा प्रत्येकी दोनदा पराभव केला. पहिल्या सामन्यात त्यांना कॅनडाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी त्यांना हरवत विश्वचषकाचे तिकीट मिळवले. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांनी २०२२ च्या हंगामात प्रभावी कामगिरी करून सर्वोत्कृष्ट पूर्ण सदस्य राष्ट्र म्हणून आधीच आपली जागा मिळवली आहे.

हेही वाचा: IND vs IRE 2nd T20: जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज मालिका जिंकणार की पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या प्लेईंग ११

पावसाने खोडा घातला तरी अमेरिका जिंकली

यूएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याला पावसामुळे उशीर झाला आणि गटातील इतर सामने रद्द होऊनही हा सामना खेळवण्यात आला. मात्र, पावसामुळे अखेर सामना २२ षटकांचा करण्यात आला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कॅनडाचा संघ २२ षटकांत नऊ गडी गमावून ९२ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात अमेरिकेने चार षटके शिल्लक ठेवत शानदार विजय मिळवला. यूएसए आता २०१० नंतर प्रथमच अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. माहितीसाठी की, न्यूझीलंड, नेपाळ, नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्यातील क्वालिफायर सामन्यांनंतर दुसऱ्या संघाचा निर्णय घेतला जाईल.

Story img Loader