UAE vs NZ, 2nd T20I: वेगवान क्रिकेटच्या या युगात कोणत्याही संघात कोणालाही हरवण्याची क्षमता आहे. विशेषत: टी२० सामन्यात एकदा संघ मागे पडला की, पुनरागमन करणे कठीण होऊन बसते. असाच काहीसा प्रकार संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पाहायला मिळाला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमधील सामना खेळला गेला, ज्यामध्ये यूएईने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करत क्रिकेट विश्वात मोठा अपसेट केला. टी२० क्रिकेटमध्ये यूएईसाठी हा विजय मोठे यश म्हणून मानले जाऊ शकते कारण, आयसीसी टी२० क्रमवारीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर यूएई १६व्या क्रमांकावर आहे. यूएईला हा विजय अनेक वर्षे स्मरणात राहील.

संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने पहिल्यांदाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडला हरवून इतिहास रचला. यूएई दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडला यूएई विरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात ७ गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकात ८ गडी गमावून १४२ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना यूएईने अवघ्या १५.४ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात १४४ धावा करत सामना जिंकला.

Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Matthew Short 5 Wickets Haul Becomes the First opening batsman from the Full Member nation to take 5 wickets in T20I
ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजाने चेंडूसह घडवला इतिहास, T20I मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
ENG vs SL 3rd Test Highlights Pathum Nissanka century r
ENG vs SL 3rd Test : पाथुम निसांकांच्या खणखणीत शतकासह श्रीलंकेने संपवला इंग्लंडमधला विजयाचा दुष्काळ
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
ENG vs SL 1st Test Who is Harry Singh Son of India Former Player RP Singh Senior in England Test Team
ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?

यूएईकडून कर्णधार मोहम्मद वसीम आणि आसिफ खान यांनी शानदार खेळी खेळली. सलामीवीर कर्णधार वसीमने २९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १८९.६६ होता. त्याचवेळी आसिफ खानने २९ चेंडूत ४८* धावा केल्या. आसिफच्या खेळीत ५ चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या वृत्त अरविंदने २१ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

हेही वाचा: U-19 World Cup: अमेरिकेची ऐतिहासिक कामगिरी! अंडर-१९ विश्वचषकासाठी पहिल्यांदाच ठरली पात्र

न्यूझीलंडचे फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे फलंदाज यूएईच्या फिरकीसमोर फ्लॉप ठरले. मार्क चॅपमनने संघासाठी ४६ चेंडूत ६३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. चॅपमनच्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. याशिवाय न्यूझीलंडचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. संघाचे एकूण ७ फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत, त्यात डेन क्लीव्हर गोल्डन डकचा बळी ठरला.

अयान खानच्या फिरकीच्या जाळ्यात किवी फलंदाज

प्रथम गोलंदाजी करताना यूएईने शानदार कामगिरी झाली. अयान खानने यूएईकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. अयानने ४ षटकात केवळ ५च्या इकॉनॉमीसह २० धावा दिल्या. याशिवाय महंमद जवादुल्लाहने ४ षटकांत २० धावा देत अवघ्या ४ धावा देत २ विकेट्स घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. तर अली नसीर, जहूर खान आणि मोहम्मद फराजुद्दीन यांना प्रत्येकी १-१ यश मिळाले.

न्यूझीलंड संघ यूएई विरुद्धच्या या टी२० मालिकेत त्यांच्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित खेळत आहे. नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. डेव्हन कॉन्वे. फिन ऍलन, डॅरिल मिशेल आणि ईश सोधीसारखे स्टार खेळाडू फ्रँचायझी क्रिकेटमध्ये व्यस्त आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यूएई विरुद्ध न्यूझीलंड

१९९६- एकदिवसीय सामना, न्यूझीलंड १०९ने जिंकला

२०२३- टी२० सामना, न्यूझीलंड १९ धावांनी जिंकला

२०२३– टी२० सामना, यूएई सात गडी राखून जिंकला