Uganda cricket team, T20 World Cup 2024: युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला असून २०२४ मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ते पहिल्यांदाच पात्र ठरले आहे. गेल्या मंगळवारी, नामिबियाचा संघ आफ्रिका क्वालिफायरद्वारे टी-२० विश्वचषक २०२४ साठी पात्र ठरला होता. आता युगांडा क्रिकेट संघाने २०२४ टी-२० विश्वचषकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-२० विश्वचषकानंतर युगांडा हा आफ्रिका खंडातील पात्रता फेरीत पात्र होणारा दुसरा संघ ठरला आहे. युगांडाने शेवटच्या सामन्यात केनियाचा ३३ धावांनी पराभव करून टी-२० स्पर्धेसाठी पात्र ठरले. पाच क्वालिफायर सामन्यापैकी युगांडाने चार सामने जिंकले. पहिल्या सामन्यात युगांडाने २८ चेंडू बाकी असताना टांझानियाचा ८ गडी राखून पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना नामिबियाविरुद्ध ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

युगांडाने यानंतर आपले तिन्ही सामने जिंकले. दुसरा सामना गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा ५ विकेट्स आणि ५ चेंडू शिल्लक असताना पराभव केला. यानंतर चौथ्या सामन्यात नायजेरियाचा ९ गडी आणि १५ चेंडू राखून पराभव केला. त्यानंतर क्वालिफायरच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात युगांडाने केनियाचा ३३ धावांनी पराभव केला.

युगांडाने झिम्बाब्वेचा पराभव केला

आफ्रिकन प्रदेशातून आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी सात संघांमध्ये पात्रता फेरी खेळली गेली, ज्यामध्ये नामिबियाचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर युगांडाचा संघ ६ सामन्यांमध्ये पाच विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. युगांडाने झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघ गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावणार हे निश्चित झाले आहे. युगांडा आणि नामिबियाचे प्रत्येकी १० गुण आहेत परंतु, चांगल्या नेट रनरेटमुळे नामिबियाचा संघ प्रथम स्थानावर आहे.

हेही वाचा: IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, धोनीने आगामी आयपीएलमध्ये खेळण्याबाबत केले सूचक विधान

हे २० संघ २०२४च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत

वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच २० संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेने आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि युगांडा या संघांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uganda african country qualified for icc t20 world cup 2024 zimbabwe got disappointed avw