विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरला आपलं वन-डे संघातलं स्थानही गमवावं लागलं आहे. हैदराबाद कसोटीत केवळ 10 चेंडू टाकल्यानंतर शार्दुलला दुखापत झाली होती, त्यामुळे पुढे तो गोलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे बीसीसीआयने खबदारीचा उपाय म्हणून उमेश यादवची पहिल्या दोन वन-डे सामन्यांसाठी संघात निवड केली आहे. उमेश यादवने हैदराबाद कसोटी सामन्यात 10 बळी घेतले होते. याआधीही आशिया चषकात शार्दुल ठाकूरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती.

Story img Loader