Indian fast bowler Umesh Yadav: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यादरम्यान उमेश यादवच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर ही उमेश यादवने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर क्रिकेट चाहते आणि खेळाडूंनी उमेश यादवचे सांत्वन केले. त्यानंतर पंतप्रधाने नरेंद्र मोदी यांनी देखील सांत्वन केले होते. त्यानंतर उमेश यादवने त्यांचे आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या उमेशच्या वडिलांचे २२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. यानंतर भारतीय क्रिकेट चाहते आणि खेळाडू या कठीण काळात उमेश यादवचे सांत्वन करताना दिसले. अशात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उमेश आणि त्याच्या कुटुंबासाठी खास संदेश पाठवला होता.
नरेंद्र मोदींनी पाठवला खास संदेश-
नरेंद्र मोदींनी उमेश यादव यांच्यासाठी आपल्या संदेशात लिहिले की, ”उमेशच्या वडिलांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. वडिलांची उपस्थिती आणि त्यांचे प्रेम हा प्रत्येकाच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार असतो.” यासोबतच नरेंद्र मोदींनी उमेश यादव यांच्या कारकिर्दीतील वडिलांच्या त्याग आणि समर्पणाचाही उल्लेख केला. त्याचबरोबर वडिल म्हणून ते सदैव उमेशच्या त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे लिहिले आहे.
उमेश यादवने मानले आभार –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या संदेशानंतर उमेश यादवने ट्विटरवर आभार मानले आणि लिहिले, “माझ्या वडिलांच्या दुःखद निधनाबद्दल आपल्या शोकसंदेशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. हा संदेश माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
भारताच्या अडचणी वाढणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघ पुढचा सामना हरला तर समीकरण अधिकच गुंतागुंतेचे होईल. कारण त्यानंतर त्यांच्या हातात काहीच राहणार नाही. कारण भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. ज्यामध्ये भारताला प्रार्थना करावी लागेल की, न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेला दोन्ही सामन्यात पराभूत करावे किंवा किमान मालिका १-० ने जिंकावी.
हेही वाचा – Shane Warne Death Anniversary निमित्त सचिन तेंडुलकरने काढली आठवण; म्हणाला, ‘आम्ही मैदानावर…’
दुसरीकडे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, उमेश यादवने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने ५ षटकांत ३ बळी घेतले. पण फ्लॉप फलंदाजीमुळे टीम इंडियाला ९ विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. उभय संघांमधील चौथा कसोटी सामना ९ मार्चपासून अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.