शुक्रवारी लाहोरमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सहाव्या टी२० सामन्यादरम्यान पंच अलीम दार यांना दुर्दैवी दुखापत झाली. फलंदाज हैदर अलीने पुल शॉट मारला आणि तो थेट आलीम दार यांना लागला. पण ते थोडक्यात बचावले नाहीतर गंभीर प्रसंग ओढवला असता. सामन्याच्या सहाव्या षटकात पंच दार लेग अंपायर म्हणून उभे होते.  इंग्लडचा गोलंदाज रिचर्ड ग्लीसनने एक शॉर्ट चेंडू टाकला आणि पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अलीने त्यावर पुल शॉट मारला. पंच आलीम दार यांनी त्या शॉटच्या मार्गातून बाहेर पडण्याचा अथक प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला आणि चेंडू त्याच्या मांडीवर आदळला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. सुदैवाने, आलीम दार यांना मोठी दुखापत झाली नाही आणि सामन्यात अंपायरिंग ते पुढे चालू ठेवू शकले.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेतील सहावा सामना लाहोरमध्ये खेळला गेला. इंग्लंडचा कर्णधार मोईन अलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने हा सामना ८ गडी राखून जिंकला. इंग्लंडने हा सामना ३३ चेंडू राखून जिंकला आणि पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. या विजयासह ७ सामन्यांच्या मालिकेत ३-३ अशी बरोबरी झाली आहे. बाबर आझमची खेळी त्याच्याच कर्णधारपदाखाली पाकिस्तानला जड गेली.

या खेळीत बाबरने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० धावाही पूर्ण केल्या. त्याने ८१ व्या डावात असे केले. सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. इंग्लंडकडून सॅम कॅरेन आणि डेव्हिड विलीने दोन फलंदाजांचे बळी घेतले.

हेही वाचा :  World Team TT Championships: जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, पुरुष संघाने केला उझबेकिस्तानचा पराभव 

तत्पूर्वी, इंग्लंडचे सलामीवीर अॅलेक्स हेल्स आणि फिलिप सॉल्ट यांनी झंझावाती सुरुवात केली. दोघांमध्ये २३ चेंडूत ५५ धावांची भागीदारी झाली. हेल्स १२ चेंडूत २७ धावा काढून बाद झाला. पण सॉल्टने एका टोकाकडून गोलंदाजांवर आक्रमण करणे सुरूच ठेवले. पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने ८२ धावा केल्या. इंग्लंडने १५व्या षटकात सामना जिंकला. फिलिप सॉल्टने ४१ चेंडूंत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या.

हेही वाचा : विश्लेषण: आधी जडेजा, आता बुमरा! भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींच्या सत्राला जबाबदार कोण?  

डेव्हिड मलानने १८ चेंडूत २६ तर बेन डकलेटने १६ चेंडूत २६ धावा केल्या. पाकिस्तानच्या शाहनवाज डहानीने २ षटकांत ३३, मोहम्मद नवाजने ४ षटकांत ४३ आणि आमेर जमालने २ षटकांत २९ धावा दिल्या. इंग्लंडकडून पडलेल्या दोन्ही विकेट शादाब खानने मिळवल्या.

Story img Loader