शुक्रवारी लाहोरमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सहाव्या टी२० सामन्यादरम्यान पंच अलीम दार यांना दुर्दैवी दुखापत झाली. फलंदाज हैदर अलीने पुल शॉट मारला आणि तो थेट आलीम दार यांना लागला. पण ते थोडक्यात बचावले नाहीतर गंभीर प्रसंग ओढवला असता. सामन्याच्या सहाव्या षटकात पंच दार लेग अंपायर म्हणून उभे होते. इंग्लडचा गोलंदाज रिचर्ड ग्लीसनने एक शॉर्ट चेंडू टाकला आणि पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अलीने त्यावर पुल शॉट मारला. पंच आलीम दार यांनी त्या शॉटच्या मार्गातून बाहेर पडण्याचा अथक प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला आणि चेंडू त्याच्या मांडीवर आदळला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. सुदैवाने, आलीम दार यांना मोठी दुखापत झाली नाही आणि सामन्यात अंपायरिंग ते पुढे चालू ठेवू शकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in