India vs Bangladesh, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये गुरूवारी (१९ ऑक्टोबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. भारतीय संघाला विजयासाठी मिळालेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली याने बांगलादेशी गोलंदाजांची धू-धू धुलाई केली. यादरम्यान त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७८वे शतक पूर्ण केले. पुण्यातील विराटच्या अनोख्या शतकाची खूप चर्चा होत आहे. सामना जिंकण्यापेक्षा विराटचे शतक कधी पूर्ण होणार? यासाठी चाहते खूप उत्सुक होते.

विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध षटकार ठोकून शतक झळकावले आणि या विश्वचषकात भारताला सलग चौथा विजय मिळवून दिला. मात्र, या विजयाच्या काही काळ आधी विराट आणि विजयाच्या साठीच्या धावा समान असल्याने चाहते विराट कोहलीच्या शतकाची वाट पाहत होते. या दरम्यान बांगलादेशचा फिरकीपटू मेहदी हसन मिराजने भारताला विजयासाठी तीन धावा असताना त्याने वाईड बॉल टाकला. जेणेकरून विराट कोहलीचे शतक होऊ नये. मात्र, अंपायर रिचर्ड केटलबरा यांनी बांगलादेशचा रडीचा डाव ओळखला आणि त्यांनी तो वाईड दिला नाही. शेवटी विराटने षटकार मारून टीम इंडियाला विजयी तर केलेच पण त्याने त्याचे शतक देखील पूर्ण केले.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Why Siraj Get Heavier Penalty Than Head after Adelaide Controversy
Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

भारताच्या या विजयासह टीम इंडिया आता चार सामन्यात ४ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. या विजयासह भारतीय संघाची उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय संघाच्या बाजूने, या सामन्याचा हिरो होता विराट कोहली. त्याने १०३ धावांची शानदार खेळी केली. कोहलीने या डावात अनेक शानदार फटके मारले. शतक पूर्ण केल्यानंतर विराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

विराटच्या इनिंगमध्ये असे काही घडले की मैदानावरील खेळाडू, प्रेक्षक आणि टीव्हीवर सामना पाहणारे चाहतेही चकित झाले. खरंतर, विराट कोहली जेव्हा त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता, तेव्हा बांगलादेशच्या गोलंदाजांनी असे काही केले जे लज्जास्पद होते. बांगलादेशच्या गोलंदाजांनी विराट कोहलीला शतक झळकावण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण विराटने त्यांच्या योजना हाणून पाडल्या आणि आपले ४८वे शतक पूर्ण केले.

हेही वाचा: Denmark Open: भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूची शानदार कामगिरी! इंडोनेशियन खेळाडूला पराभूत करत केला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

खरेतर, विराट कोहली आपले शतक पूर्ण करण्यापासून ८ धावा दूर होता, तेव्हा भारतीय संघाला ते नोंदवण्यासाठी ८ धावांची गरज होती. त्यावेळी बांगलादेशच्या गोलंदाजाने वाइड बॉल टाकला. त्यावेळी कोहलीचे शतक पूर्ण करण्याचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत होते. यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुन्हा वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी विराट कोहली शतकापासून अवघ्या ३ धावा दूर होता. बांगलादेशच्या गोलंदाजाने तो लेग साइडने टाकला. यानंतर अंपायर हा चेंडू वाईड घोषित करतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र विराट कोहली क्रीझमध्ये चालत असल्याने हे होऊ शकले नाही. शेवटी विराट कोहलीने षटकार ठोकत आपले ४८वे शतक पूर्ण केले. यावेळी के.एल. राहुलने देखील त्याला खूप मदत केली. शेवटचे पाच षटके त्याने स्ट्राईक घेतलीच नाही. त्यामुळे विराट त्याचे शतक करू शकला.

Story img Loader