आज आपण एकविसाव्या शतकात राहतो. आजच्या युगात महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. तरी अनेकदा महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचा छळ, त्यांच्या दिसण्यावरुन सार्वजनिक ठिकाणी होणारी टीप्पणी अशा अनेक गोष्टींबद्दल ऐकायला आणि वाचायला मिळते. असाच काहीसा लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे फ्लॉरेन्स एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेदरम्यान. या स्पर्धेमधील एका समान्यादरम्यान मुळचे इटलीचे असणारे पंच जियानलुका मॉस्केरेला यांनी टेनिस कोर्टवरील बॉल गर्लला ‘तू खूप सेक्सी’ असल्याचे म्हटले. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉस्केरेला यांनी संपूर्ण सामन्यादरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा व्हिडिओच व्हायरल झाला आहे. यामध्ये पंच १६ वर्षीय बॉल गर्लला पाहून अश्लील शेरेबाजी करताना दिसत आहे. टेनिसच्या कोर्टवर नेटच्या दोन्ही बाजूला उंचावर असणाऱ्या पंचांच्या खुर्चीवर बसून मॉस्केरेला शेरेजाबी करत होते. नेटजवळ खाली बसलेल्या १६ वर्षीय बॉल गर्लकडे पाहून ‘तू खूप सेक्सी दिसत आहेस’, ‘तू फॅण्टॅस्टीक आहे’, ‘इथे खूप गरम होतं आहे. तुला गरम होत आहे का? फिजीकली आणि इमोशनली?’, अशी शेरेबाजी त्यांनी केली. तसेच अनेकदा त्यांनी गरज नसताना या बॉल गर्लकडे पाहून ‘लक्ष दे लक्ष दे’, ‘कम ऑन’, ‘दोनच मिनिटं थांब संपेल’, अशी वक्तव्य केल्याचे उघड झाले आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार हे प्रकरण समोर आल्यानंतर मॉस्केरेला यांची या मालिकेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. याप्रकरणामध्ये सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. द असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेश्नल्सने (एटीपीने) जाहीर केलेल्या पत्रकामध्ये ‘मॉस्केरेला यांच्याबरोबर एटीपीने केलेले सर्व करार रद्द करण्यात आले आहेत. तसेच पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आता आम्ही या प्रकरणामधील चौकशी अहवालाची वाट पाहत आहोत,’ असं म्हटलं आहे.

मॉस्केरेला यांच्या या शेरेबाजीवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी या त्यांच्यावर आयुष्यभराची बंदी घालण्याची मागणी केली आहे. जाणून घेऊयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे…

चुकीचं आहे हे

बंदी घाला

एक तर हा पंच वेडा आहे नाहीतर

काय फालतुगिरीय

हे चुकीचं

विचित्र आणि संक्षयास्पद

अयोग्य

भयंकर

आयुष्यभरासाठी बंदी घाला

यासाठी चौकशीची काय गरज

जियानलुका मॉस्केरेला

दरम्यान, या प्रकरणामध्ये आता एटीपी या पंचावर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अनेकदा प्रेक्षकांकडून होणारी शेरेबाजी पंचच करु लागल्यामुळे पंचाची निवड करताना अधिक काळजी घ्यायला हवी असंही मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.