ICC World Cup 2023 Semi Finals Umpires: एकदिवसीय विश्वचषक २०२३चे साखळी सामने संपले आहेत. आता या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने पंचांची घोषणा केली आहे. रिचर्ड इलिंगवर्थ आणि रॉड टकर हे या सामन्याचे मैदानी पंच असतील. तिसऱ्या पंचाची जबाबदारी जोएल विल्सन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉड टकर आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीतील मैदानावरील पंच असतील. टकरसाठी हा सामना खूप खास असणार आहे, कारण या सामन्यात ते पंच म्हणून १०० एकदिवसीय सामने पूर्ण करतील. आयसीसीने सोमवारी उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये स्वतः कौन्सिलनेही टकर यांचा हा विक्रमी टप्पा शेअर केला आहे. टकर यांनी जानेवारी २००९ मध्ये पहिला एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग केले होते. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात ते आपल्या वन डे अंपायरिंग कारकिर्दीचे शतक पूर्ण करतील.

या सामन्यात टकर यांच्याबरोबर तिसरे पंच जोएल विल्सन, चौथे पंच अ‍ॅड्रियन होल्डस्टॉक आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट असतील. टकरपूर्वी पंच रिचर्ड कॅटलबरो यांनीही या स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. २१ ऑक्टोबर रोजी नेदरलँड विरुद्ध श्रीलंका सामन्यात केटलबरो यांनी १०० वा एकदिवसीय सामना पूर्ण केला.

हेही वाचा: IND vs NZ, Semi-final: मुंबईत पोहचताच द्रविडने केली खेळपट्टीची पाहणी, सेमीफायनलमध्ये कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? जाणून घ्या

रिचर्ड पुन्हा भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीत सहभागी होणार आहेत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना सर्वांनाच आठवत असेल. महेंद्रसिंग धोनीला दिलेला तो रनआऊट आजही क्रिकेट चाहते ते दुख: मनातून विसरू शकलेले नाहीत. आता उपांत्य फेरीत भारताचा पुन्हा एकदा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. रिचर्ड इलिनवर्थ पुन्हा या सामन्यात सहभागी अंपायरिंग करणार आहेत.

रिचर्ड कॅटलबरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी विश्वचषक २०१९ मध्ये हा कार्यभार सांभाळला होता. तर यावेळी रॉड टकर आणि इलिनवर्थ यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वीही भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीत इलिंगवर्थ हे मैदानावरील पंच होते.

हेही वाचा: World Cup 2023: गौतम गंभीरने रोहित शर्माच्या कॅप्टन्सीची सांगितली खास वैशिष्ट्ये; म्हणाला, “भारताच्या इतर कर्णधारापेक्षा तो…”

हे दोन्ही उपांत्य फेरीतील पंच आणि सामनाअधिकारी असतील

सेमीफायनल-१: भारत विरुद्ध न्यूझीलंड, बुधवार १५ नोव्हेंबर, मुंबई</strong>

मैदानावरील पंच: रिचर्ड इलिंगवर्थ आणि रॉड टकर

तिसरा पंच: जोएल विल्सन

चौथा पंच: एड्रियन होल्डस्टॉक

सामनाधिकारी: अँडी पायक्रॉफ्ट

सेमीफायनल-२: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, गुरुवार १६ नोव्हेंबर, कोलकाता

मैदानावरील पंच: रिचर्ड केटलबरो आणि नितीन मेनन

तिसरा पंच: ख्रिस गॅफनी

चौथा पंच: मायकेल गफ

सामनाधिकारी: जवागल श्रीनाथ

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umpire will also make a record in the india new zealand semi final match icc released the list of match officials avw