कुशल मेंडिस आणि अँजेलो मॅथ्यूस यांच्या नाबाद भागीदारीसह पावसाने श्रीलंकेला दिलासा दिला. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी त्यांना अनिर्णित राखता आली.
श्रीलंकेने दुसऱ्या उावात ३ बाद २८७ अशी मजल मारली. डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना आणखी नऊ धावांची आवश्यकता होती. पाचव्या दिवशी पावसामुळे जेमतेम १३ षटकांचा खेळ होऊ शकला. मेंडिसने नाबाद १४१ आणि मॅथ्यूजने नाबाद १२० धावा करीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना झगडायला लावले. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी २७४ धावांची नाबाद भागीदारी केली.
न्यूझीलंडला ५७८ धावांचा डोंगर उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलताना टॉम लॅथमने नाबाद २६४ धावांची खेळी साकारली होती. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.