बॉक्सिंग रिंगमध्ये दबदबा निर्माण करणारी आणि पाच वेळा विश्वविजेतेपदासह ऑलिम्पिक कांस्यपदकापर्यंत झेप घेणारी मणिपूरची बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिचा आतापर्यंतचा संघर्ष शब्दबद्ध झाला आहे. कठोर परिस्थितीवर मात करून बॉक्सिंगमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मेरी कोमच्या ‘अनब्रेकेबल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सोमवारी झाले.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेरी कोमचा अविरत संघर्ष थक्क करणारा आहे. आपल्या या संघर्षांबद्दल मेरी कोम म्हणाली, ‘‘देशातील महिलांच्या वाटय़ाला जो संघर्ष येतो, तशाच प्रकारच्या संघर्षांला तोंड देऊन मी बॉक्सिंगमध्ये नावलौकिक कमावला. माझ्या संघर्षांमुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी, यासाठीच मी माझे आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले. आवड, समर्पित वृत्ती आणि श्रद्धा यांच्या बळावरच कोणतीही स्वप्ने पूर्ण करता येतात.’’
अमिताभ बच्चन यांनी मेरी कोमच्या खेळातील योगदानाबद्दल तिची स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘मेरी कोमचा संघर्ष प्रेरणादायी आहे. तिच्या आत्मचरित्राचे अनावरण करण्याची संधी मिळणे, माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तिचा संघर्ष युवा खेळाडूंसाठीच नव्हे तर आयुष्याची लढाई जिंकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा