समितीच्या निर्णयामुळे संभ्रमभारतीय ऑलिम्पिक संघटनेवरील बरखास्तीच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक महासंघावर(आयओए) घातलेल्या बंदीमुळे आयओएच्या बुधवारी होऊ घातलेल्या निवडणुकीवरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या सगळय़ांना केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी केला.
आयओएची निवडणूक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. मात्र बंदीच्या कारवाईमुळे त्याबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. आयओएच्या अध्यक्षपदी अभयसिंग चौताला तर सरचिटणीसपदी ललित भानोत यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गैरव्यवहारप्रकरणी भानोत यांना नऊ महिने तुरुंगवासात जावे लागले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खटले सुरू आहेत.
आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी सांगितले, आम्ही शासनास आमच्यावर क्रीडा नियमावली लादू नका असे गेली दोन वर्षे वारंवार सांगत होतो. मात्र त्याबाबत शासनाने हट्टीपणा सोडला नाही. पंतप्रधानांनी याबाबत मध्यस्थी करावी यासाठी आम्ही त्यांनाही २३ नोव्हेंबर रोजी पत्र लिहिले होते. मात्र त्यांच्याकडून आम्हास कोणतेही उत्तर आले नाही. केंद्र शासन, आयओसीचे प्रतिनिधी व आमचे प्रतिनिधी असे एकत्र बसून काही चांगला तोडगा काढण्याबाबतही आम्ही प्रयत्न करीत होतो. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आम्हाला शासकीय क्रीडा नियमावलीनुसारच निवडणूक घेण्याखेरीज आमच्यापुढे कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.
आयओएला ‘बाय-बाय’. आयओएच्या कारभारातील गोंधळामुळेच ही कारवाई झाली आहे. महासंघात आता स्वच्छ प्रशासन येईल अशी आशा आहे.
– अभिनव बिंद्रा, नेमबाज
हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. मी या प्रकरणाचा अधिक सविस्तर अभ्यास केलेला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम काय होईल हे आता सांगणे अवघड आहे.
– गगन नारंग, नेमबाज
नेमके काय विपरीत घडले आहे हे सांगणे अवघड आहे मात्र हा निर्णय अतिशय दुर्दैवी व खेळाडूंचे हितास बाधा आणणारा आहे. यामध्ये लवकरच तडजोड व्हायला पाहिजे. आयओसीच्या नियमावलीनुसारच निवडणुका होणे आवश्यक आहे. आपल्याकडील क्रीडा नियमावली ही ऑलिम्पिकच्या नियमावलीनुसारच आहे. त्यामुळे आयओसीने ही पावले का घेतली हे मला उलगडलेले नाही.
– विजेंदर सिंग, बॉक्सर
ही आम्हा खेळाडूंसाठी धक्कादायक बातमी आहे. संघटनांमधील भांडणांमुळे खेळाडूंनाच अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही आता सराव तरी कसा करायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. जर या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा झाला नाही तर आम्हा खेळाडूंचेच अधिक नुकसान होणार आहे.
– मेरी कोम, बॉक्सर
माझ्यावर बंदीची कारवाई करणाऱ्या आयओएलाच आता बंदीच्या कारवाईस सामोरे जावे लागत आहे. ही घटना अपेक्षितच होती. आता पुढे आणखी कोणत्या आश्चर्यजनक घटना घडतील, हे देव जाणे!
– महेश भूपती, टेनिसपटू
हा भारतीय क्रीडा क्षेत्राचा मोठा अपमान आहे. यामुळे खेळाडूंचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे.
– लिंबाराम, तिरंदाजी प्रशिक्षक
ही अतिशय धक्कादायक व खेदजनक घटना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रास काळिमा फासणारी ही घटना आहे. यामुळे खेळाडूंना अधिक अडचणीत टाकले आहे. केंद्रशासन आयओसीशी चर्चा करुन लवकरच तोडगा काढेल अशी आशा आहे. खेळाडूंना आयओसीच्या ध्वजाखाली भाग घेण्याची संधी असली तरी कोणत्याही स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानास्पद असते.
– जॉयदीप कर्माकर, नेमबाज
या संपूर्ण प्रकरणाला आयओए जबाबदार असून त्यामुळे आता खेळाडूंचे प्रचंड नुकसान होणार आहे. या बरखास्तीमुळे खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. देशाला पदके मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करत असतो. पण स्वार्थी प्रशासकांमुळे आता सर्व काही संपले आहे.
– तरुणदीप राय, तिरंदाज
या प्रकरणी भारतीय ऑलिम्पिक संघटनाच पूर्णपणे जबाबदार आहे. स्वत:ची आचारसंहिता स्थापन करा, असे आम्ही आयओएला यापूर्वीच बऱ्याच वेळा सांगितले होते. आयओएची आचारसंहिता असती तर ही नामुष्की टाळता आली असती.
– जितेंद्र सिंग, क्रीडामंत्री