अंतिम लढतीच्या संयोजनात अनेक अडचणी
भारताचा आगामी कनिष्ठ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा एकही सामना फुटबॉलच्या पंढरीत म्हणजेच कोलकातामध्ये होत नाही, हीच खंत येथील कामगारांपासून ते संयोजकांपर्यंत सर्वाना खटकत आहे. त्यामुळेच या ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे संयोजनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सॉल्ट लेक स्टेडियमवर गटसाखळी आणि बाद फेरीच्या सामन्यांसहित अंतिम सामना २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी या स्टेडियमचे नूतनीकरण व आजूबाजूचा परिसर सुशोभित केला जात आहे, मात्र हे काम अपेक्षेइतके वेगाने होत नसल्यामुळे संयोजकांना चिंतेत टाकले आहे. स्टेडियमच्या कडेने विटांची भिंत बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. या भिंतीवर तारेचे कुंपणही बांधले जाणार आहे. तसेच भिंतीवर रंगही मारला जाणार आहे. त्याचप्रमाणे स्टेडियमकडे येणाऱ्या विविध प्रमुख रस्त्यांवरही सुशोभीकरण केले जात आहे. हे काम सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असली तरी त्या मुदतीत हे काम पूर्ण होईल की नाही या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.
बंगालमध्ये दुर्गा महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा हा उत्सव २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. सर्वसाधारणपणे या उत्सवाच्या काळात बहुंताश कामगार कामाऐवजी उत्सव साजरा करण्यात गर्क असतात. हे लक्षात घेता स्टेडियमशी संबंधित कामे त्यापूर्वी होण्याची शक्यता कमी आहे. येथे दररोज सायंकाळी मुसळधार पाऊस असतो व या पावसामुळे रस्त्यांवर दीड दोन फूट पाणी साचते. त्याचाही व्यत्यय सुशोभीकरणाच्या कामात येत आहे.
कोलकाता येथे भारताचे दोन-तीन सामने आयोजित करण्याची मागणी संयोजकांनी केली होती. मात्र भारताचे सर्व साखळी सामने नवी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे या शहरात अन्य देशांचे सामने आयोजित केल्यास त्यास विरोध करावा, अशी मागणीही काही फुटबॉल चाहत्यांनी व क्लबनी केली होती. मात्र संयोजकांनी त्यांना समजावल्यानंतर त्यांचा विरोध मावळला आहे, तरीही अपेक्षेइतका उत्साह या सामन्यांच्या तयारीबाबत दिसून येत नाही.
विश्वचषकाच्या सामन्यांच्या वेळी वाहतूक व्यवस्थेचेही आव्हान आहे. स्टेडियमजवळील काही परिसरात मेट्रो रेल्वेचेही काम सुरू असल्यामुळे सध्या रोजच वाहतुकीच्या समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. स्टेडियम परिसरात अनेक कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे तेथे काम करणाऱ्या लोकांना बरीच पायपीट करावी लागणार आहे. भुयारी रेल्वे असली तरी त्यावर अतिरिक्त लोकांचा बोजा पडण्याची शक्यता आहे. या रेल्वेगाडय़ांमध्ये सामन्यांच्या काळात वाढ करावी, अशी मागणीही केली जात आहे. ही मागणी मान्य झाली तरच वाहतुकीबाबतची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.