जमैकाचा महान धावपटू युसेन बोल्टने वॉरसॉ नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर झालेल्या १०० मीटर इन्डोअर शर्यतीत ९.९८ सेकंद अशी वेळ नोंदवत नवा विक्रम नोंदवला. याआधी इन्डोअर शर्यतीत नामिबियाच्या फ्रँकी फ्रेडेरिक्सने १९९६मध्ये रचलेला १०.०५ सेकंदांचा विक्रम बोल्टने मागे टाकला. ऑलिम्पिक विजेत्या आणि ९.५८ सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या बोल्टसाठी पुढील आठवडय़ात झुरिकमध्ये होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेसाठी ही स्पर्धा म्हणजे सरावाची नामी संधी ठरली. तो म्हणाला, ‘‘या मोसमात कोणत्याही दुखापतीला निमंत्रण न देता मला पुढील काही वर्षे अविरतपणे धावायचे आहे. झुरिकमध्ये मी यापेक्षाही सर्वोत्तम वेळ देण्याचा प्रयत्न करेन.’’
युसेन बोल्टचा १०० मीटर इन्डोअर शर्यतीत नवा विक्रम
जमैकाचा महान धावपटू युसेन बोल्टने वॉरसॉ नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर झालेल्या १०० मीटर इन्डोअर शर्यतीत ९.९८ सेकंद अशी वेळ नोंदवत नवा विक्रम नोंदवला.
First published on: 25-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under closed roof usain bolt breaks 10 seconds