Pakistan tops ODI rankings for first time: यावर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने क्रिकेट विश्वात मोठा धमाका केला आहे. वास्तविक, पाकिस्तानचा संघ क्रिकेट प्रथमच एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा संघ बनला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने शुक्रवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून ही कामगिरी केली. कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा १०२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाकिस्तानने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
या क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर –
न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी २७ एप्रिल रोजी पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत ५ व्या स्थानावर होता. त्यानंतर एका महिन्यात पाकिस्तानने अव्वल स्थान गाठले आहे. या क्रमवारीत पाकिस्तान २९ सामन्यातील ११३ रेटिंगसह अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलियाही ३५ सामन्यातील ११३ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचेही ४५ सामन्यात ११३ गुण आहेत, मात्र भारत क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप ५ बद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंड चौथ्या आणि न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे.
एका दिवसात नंबर एकचा मुकुट हिसकावून घेतला जाऊ शकतो –
आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचताच पाकिस्तानचे क्रिकेट चाहते खूप आनंदी होत आहेत. पण फक्त एका दिवसात त्याची टीम पुन्हा एकदा वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर येईल. खरेतर, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्या मालिकेतील पाचवा अंतिम वनडे अजून बाकी आहे. जर या सामन्यात पाकिस्तानचा पराभ झाला, तर पुन्हा एकदा त्यांचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. दोन्ही संघांमधला पुढील सामना ७ मे रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत त्याचा हा आनंद केवळ एका दिवसासाठीच असू शकतो.
हेही वाचा – IPL 2023: विराटला लहानपणापासून बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करायचे होते, मित्राच्या आईने केला खुलासा, पाहा VIDEO
बाबर आझमसाठी मोठी गोष्ट –
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमसाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ प्रथमच आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. २००५ मध्ये प्रथमच आयसीसीने क्रमवारी प्रणाली लागू केली. तेव्हापासून आजतागायत पाकिस्तानचा संघ कधीही यात पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकला नाही. या क्रमवारीत पाकिस्तान संघ पहिल्या स्थानावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तान आणि त्यांच्या कर्णधारासाठी ही आनंदाची बाब आहे.