कारकीर्दीतील अखेरची लढत अविसमरणीय व्हावी, असे मला वाटत आहे. त्यामुळे अखेरची लढत फ्लॉइड मेवेदर किंवा अमीर खान यांच्याबरोबर करण्यासाठी उत्सुक आहे, असे मत फिलीपाइन्सचा आंतरराष्ट्रीय बॉक्सर मॅनी पॅक्विओने व्यक्त केले.
‘‘व्यावसायिक बॉक्सिंगमधून निवृत्त होण्यापूर्वी या दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूशी खेळण्याची माझी इच्छा आहे. या दोन्ही खेळाडूंबरोबर सध्या बोलणी सुरू असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ही लढत आयोजित केली जाईल. बॉक्सिंगमधील कारकीर्दीतून निवृत्त झाल्यानंतर मी राजकीय क्षेत्रात सक्रिय होणार आहे,’’ असे पॅक्विओ म्हणाला.

Story img Loader