नवी दिल्ली/मुंबई: २ नोव्हेंबर २०२३ – युनिसेफचे दक्षिण आशिया क्षेत्रीय राजदूत आणि क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी आज मुंबईत भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान श्रीलंकेचे क्रिकेट आयकॉन मुथय्या मुरलीधरन यांच्यासोबत मुलांसाठी एका दिवसाचे नेतृत्व केले आणि लिंग समानतेचे आवाहन केले. ‘एक दिवस मुलांसाठी’ या आयसीसी-युनिसेफ भागीदारी अंतर्गत भारतामध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष विश्वचषक क्रिकेट २०२३ दरम्यान मुलांच्या समस्या आणि त्यांचे हक्क यांचे समर्थन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
सामन्याच्या दुसऱ्या डावात, सचिन तेंडुलकर आणि मुथय्या मुरलीधरन यांनी प्रतिकात्मक बटण दाबताच ३२,००० प्रेक्षक क्षमता असलेले वानखेडे स्टेडियम निळ्या रंगात उजळले.
विश्वचषक हा लोकांना एकत्र आणण्यासाठीचा क्षण
“विश्वचषक हा लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि प्रत्येक मुलासाठी आशा आणि समानतेचा प्रचार करण्यासाठी एक योग्य क्षण आहे. मला आनंद होत आहे की, श्रीलंका आणि भारत यांच्यातील आजचा सामना हा मुलांसाठी समर्पित सामना आहे,” असे क्रिकेटचे आयकॉन सचिन तेंडुलकर म्हणाले. “मी खेळाडूंना, येथील आणि जगभरातील प्रेक्षकांना आणि आयसीसीच्या भागीदारांना विनंती करतो की, सर्वांनी लिंगभेदभाव न करता, मुला-मुलींना समान वागणूक देण्याची आणि सर्व मुलांना, विशेषत: मुलींना समान अधिकार असलेल्या जगाची निर्मिती करण्याची प्रतिज्ञा करावी. मी प्रत्येकाला मुलांसाठी चॅम्पियन बनण्याचे आवाहन करतो आणि लिंग असमानता एकत्रितपणे संपवण्याची प्रतिज्ञा करतो!”
प्रेक्षकांना एलईडी रिस्ट बँड
सामन्यापूर्वी, स्टेडियममधील प्रेक्षकांना स्टँडवर येताच प्रवेश बिंदूंवर एलईडी रिस्ट बँड देण्यात आले त्यामाध्यमातून स्टेडियम निळे झाले. एलईडी रिस्ट बँडमधील क्यूआर कोड मुलांसाठी असलेल्या प्रतिज्ञाशी जोडलेले होता. बँड मिळालेल्या प्रत्येकाला क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी आणि शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. खेळाडूंनी खेळाडूंच्या नावांसह विश्वचषक, ‘वन डे फॉर चाइल्ड’ आणि युनिसेफचे लोगो असलेले आर्मबँडदेखील घातले होते.
“आजचा विश्वचषक सामना सर्व मुलांच्या हक्क आणि कल्याणासाठी समर्पित आहे. लाखो मुली आणि मुलांच्या चांगल्या, सुरक्षित आणि आनंदी जीवनासाठी क्रिकेटच्या माध्यमातून जगभरात पोहोचण्याची मौल्यवान संधी आम्हाला क्वचितच मिळते,” सिंथिया मॅककॅफ्रे, प्रतिनिधी, युनिसेफ इंडिया म्हणाल्या. “आम्ही क्रिकेटचे लाखो तरुण चाहते आणि अनुयायांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, लिंग समानतेचा प्रचार करण्यासाठी, त्यांना चॅम्पियन बनण्यासाठी, विशेषत: मुलींसाठी क्रिकेटचा वापर करण्यासाठी आयसीसीसोबत केलेल्या भागीदारीला खूप महत्त्व देतो,” असे त्या म्हणाल्या.
युनिसेफ आणि आयसीसी २०१६ पासून मुलांचे आणि तरुण जीवन सुधारण्यासाठी क्रिकेटच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. ही भागीदारी २०२२ पासून क्रिकेटच्या माध्यमातून मुली आणि तरुणींच्या सक्षमीकरणावर भर देत आहे.
“माझा ठाम विश्वास आहे की खेळ खेळल्याने मुलांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन येऊ शकते. खेळांमध्ये मुलींचा सहभाग सुनिश्चित केल्याने लिंग भेद करणाऱ्या नियमांना आव्हान मिळू शकते. शाळा, खेळाची मैदाने आणि घरांमध्येही दृष्टीकोन बदलू शकतो,” तेंडुलकर म्हणाले. “मुली आणि मुले सर्वत्र, चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहतात आणि जेव्हा मुली चांगले करतात, तेव्हा आपण सर्व चांगले करतो!” असेही त्यांनी सांगितले.
जगातील ६०० दशलक्ष किशोरवयीन मुलींपैकी एक तृतीयांश – किंवा तब्बल १७० दशलक्ष मुलींचे घर दक्षिण आशियात असून त्यांच्या क्षमतांचा म्हणावा तसा वापर होत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक ५ पैकी एक मुलगी कुपोषित आहे. अर्ध्याहून अधिक किशोरवयीन मुली रक्तक्षयग्रस्त आहेत. केवळ ३६ टक्के मुलींनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. पुराव्यांवरून असे दिसून येते की मुली आणि स्त्रियांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये पुरेशा गुंतवणुकीसह, जग १२ दशलक्षाहून अधिक जीव वाचवू शकते आणि ३० दशलक्षाहून अधिक नको असलेल्या गर्भधारणा रोखू शकते.
भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ICC पुरुष विश्वचषक क्रिकेटने लाखो चाहते आणि दर्शकांना आकर्षित केले आहे. मुलांसाठी एकदिवसीय कार्यक्रमाव्यतिरिक्त, युनिसेफ आणि आयसीसीने विश्वचषक २०२३ दरम्यान अनेक क्रिकेट उपक्रमांद्वारे लिंग समानतेला प्रोत्साहन दिले आहे. उदाहरणार्थ, भारतातील ८ शहरांमध्ये, प्रत्येक १० संघातील क्रिकेटपटू १० क्रिकेट क्लिनिकमध्ये सुमारे ५० तरुण मुला-मुलींसोबत खेळले.
ऑगस्ट २०२३ मध्ये, युनिसेफचे दक्षिण आशिया क्षेत्रीय राजदूत म्हणून सचिन तेंडुलकर यांनी श्रीलंकेला भेट दिली आणि कोविड महामारी आणि २०२२ च्या आर्थिक संकटामुळे प्रभावित झालेल्या मुलांची आणि पालकांची भेट घेतली.
संपादकांसाठी विशेष नोटः फोटो या लिंकवर टाकण्यात येतली.
युनिसेफविषयीः
जगातील सर्वात वंचित मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी युनिसेफ जगातील काही दुर्गम भागांत काम करते. १९० देश आणि प्रदेशांमध्ये, प्रत्येक मुलासाठी, सर्वत्र, प्रत्येकासाठी एक चांगले जग तयार करण्यासाठी आम्ही कार्य करतो.
युनिसेफ आणि मुलांसाठीचे काम याबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.unicef.org/india/ ला भेट द्या किंवा https://www.unicef.org/southasia/